एक्स्प्लोर

GST Bhavan | जीएसटी भवनवर दहाव्या मजल्याचा भार; व्हीजेटीआयच्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून उघड

मुंबईतील माझगाव येथील जीएसटी भवनवर दहाव्या मजल्याचा भार वाढल्याचे व्हीजेटीआयच्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून उघड झालं आहे. त्यामुळे हा मजला पाडला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई : माझगाव येथील जीएसटी भवनात लागलेल्या आगीमुळे मोठं नुकसान झालंय. व्हीजेटीआयच्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून जीएसटी भवनातील दहाव्या मजल्याचा भार वाढल्याचे निष्पन्न झालं होतं. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याची बाब आता समोर आली आहे. 2019 मध्येच स्ट्रक्चरल ऑडीट करुन दहावा मजला निष्कासित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. माझगांव येथील ज्या जीएसटी भवनमध्ये आग लागली त्याठिकाणी काहीही अनधिकृत बांधकाम नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या इमारतीमधील दहाव्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या कार्यालयांमुळे इमारतीवर भार वाढत असल्याचा अहवाल व्हीजेटीआयने दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे आता हा मजला तोडला जाणार असल्याचे समजते. शॉकसर्किटने आग लागल्याचा अंदाज - माझगाव येथे विक्रीकर भवन आहे. काही वर्षांपूर्वी ते वॅट भवन नंतर आता जीएसटी भवन म्हणून ओळखले जाते. जीएसटी भवनच्या दोन इमारती असून त्यातील एक इमारत 1965 ला दुसरी 1972 ला बांधण्यात आली होती. तळ अधिक नऊ मजली असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावर आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान आग लागली. या आगीवर सुमारे तीन तासानंतर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे. इमारतीच्या नवव्या मजल्यावरील कार्यालये नूतनीकरण केली जात होती. त्याजागी जुने लाकडी सामान असेच ठेवण्यात आले होते. शॉकसर्किटने आग लागल्यावर जुन्या लाकडी सामानाने पेट घेऊन आग भडकल्याचे समोर आले आहे. याच दरम्यान इमारतीचा दहावा मजला चर्चेचा विषय बनला आहे. GST भवन राम भरोसे | जीव मुठीत घेऊन हजारो कर्मचारी करतायेत काम जीएसटी भवनमध्ये दहावा मजला अनधिकृत - जीएसटी भवनमध्ये दहावा मजला अनधिकृत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत पालिकेने काहीही बेकायदेशी बांधकाम नसल्याची माहिती दिली आहे. तर ही इमारत 55 वर्ष जुनी होती. या इमारतीचे एक ते दिड वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. ऑडिटसाठी व्हीजेटीआय संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. इमारत नऊ मजल्याची असताना त्यात कर्मचाऱ्यांना जागा कमी पडत असल्याने दहावा मजला बांधण्यात आला. या मजल्यामुळे इमारतीवर भार वाढला असून तो निष्कासित करावा असा रिपोर्ट देण्यात आला आहे. त्याप्रमाणे इमारतीचा दहावा मजला काढून टाकण्याचे काम सुरु होते. हे काम सुरु असतानाच आग लागून इमारतीचे वरील तीन मजले जाळून खाक झाले आहेत. Mumbai Fire | तीन तासांनंतर मुंबईतल्या जीएसटी भवनाला लागलेली आग आटोक्यात | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget