Santosh Juvekar on Chhaava Movie: 'छावा'च्या यशानंतर संताजी-धनाजी यांच्यावर चित्रपट यायला हवा; संतोष जुवेकरची इच्छा
Santosh Juvekar on Chhaava Movie: 'छावा'च्या यशानंतर संताजी-धनाजी यांच्यावर चित्रपट बनायला हवाय, अशी इच्छा संतोष जुवेकरनं बोलून दाखवली आहे.

Santosh Juvekar on Chhaava Movie: 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) सध्या जोरदार गाजतोय. या चित्रपटानं भल्याभल्या दिग्गजांचे रेकॉर्ड धुळीस मिळवले आहेत. अशातच या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिकेत विक्की कौशल (Vicky Kaushal) दिसून आला. पण, त्यासोबतच इतरही अनेक मराठमोळे कलाकारही झळकले आहेत. त्यापैकी एक मराठमोळा अभिनेता म्हणजे, संतोष जुवेकर (Santosh Juvekar). 'छावा'मध्ये संतोष जुवेकरनं रायाजीची भूमिका साकारली आहे. अशातच संतोष जुवेकर सध्या नेटकऱ्यांच्या टीकेचा धनी झाला आहे. संतोषवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. अशातच ट्रोलिंग सुरू असतानाच संतोष जुवेकरनं आणखी एक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
'छावा'मध्ये झळकल्यानंतर मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनं वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली. त्यापैकी एका मुलाखतीत बोलताना मी सेटवर मुघलांची भूमिका साकारलेल्या एकाही व्यक्तीशी बोललो नाही. अक्षय खन्नाकडे तर मी पाहिलंदेखील नाही, असं संतोष जुवेकर म्हणालेला. अशातच आता तारांगणला दिलेल्या मुलाखतीत बोलताना संतोषनं एक इच्छा बोलून दाखवली आहे. संतोषनं व्यक्त केलेल्या या इच्छेबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. तारांगणशी बोलताना संतोष जुवेकरनं 'छावा'च्या यशानंतर संताजी-धनाजी यांच्यावर चित्रपट बनायला हवा, असं म्हटलं आहे.
"छावा'नंतर आता संताजी आणि धनाजीवर चित्रपट यावा"
संतोष जुवेकरला विचारण्यात आलं की, छत्रपती संभाजी महाराजांवर आणखी काही चित्रपट हिंदीत यावेत, असं वाटतं का? त्यावर बोलताना संतोष म्हणाला की, अर्थात... मला एवढंच म्हणायचं आहे की, आपला इतिहास केवळ महाराष्ट्रलाच नाहीतर संपूर्ण जगाला कळावा... कारण तो खूप मोठा इतिहास आहे..." तसेच, पुढे बोलताना त्याला विचारलं की, कोणत्या व्यक्तिरेखांवर चित्रपट यायला हवा असं तुला वाटतं? यावर बोलताना संतोष म्हणाला की, मला खूप इच्छा आहे की, छत्रपती संभाजी महाराजांवरच्या 'छावा'नंतर आता संताजी आणि धनाजीवर चित्रपट यावा... मी असेन-नसेन पण सिनेमा यायला हवा, ते खूप महत्त्वाचं आहे..."
'छावा'च्या यशाबाबत विचारल्यानंतर अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला की, "माझ्या मनात सध्या खूप रंगीबेरंगी भावना आहेत. फुल्ल ऑफ कलर्स... म्हणजे मी असं म्हणीन ना की, जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला... मी खरं सांगीन की, बऱ्याच लोकांना वाटतं मी फार... (संतोष खळखळून हसाल) पण जाऊ देत... मनापासून सांगतो की, ही केवळ आणि केवळ महाराजांची कृपा आहे, देवाची कृपा आहे... अर्थात आमच्या सगळ्या टीमची मेहनत आहे."
"मी फक्त चांगल्याच गोष्टी स्वतःकडे ठेवतो..."
सध्या होणाऱ्या ट्रोलिंगवरही यावेळी संतोष जुवेकरनं भाष्य केलं. यावर बोलताना 'छावा'फेम अभिनेता म्हणाला की, "नाही मला काही सांगायचं नाही... मला एवढंच सांगायचंय की, मी फक्त चांगल्या गोष्टीच स्वतःकडे ठेवतो." पुढे बोलताना संतोष जुवेकरनं आपल्या आगामी प्रोजक्ट्सबाबतही माहिती दिली. तो म्हणाला की, आता मे किंवा जूनमध्ये अनुराग कश्यप यांची एक फिल्म आहे, ती येतेय आणि एक-दोन मराठी चित्रपट येऊ घातले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
