धक्कादायक! नराधम तरुणाकडून रस्त्यावरील कुत्र्यावर अत्याचार, 'त्या' कारणासाठी कुत्र्याच्या गुप्तांगावर कट मारले
Man Has Sex With Street Dog, Bengaluru News : नराधम तरुणाकडून रस्त्यावरील कुत्र्यावर अत्याचार करण्यात आल्याची घक्कादायक घटना समोर आलीये.

Man Has Sex With Street Dog, Bengaluru News : नराधम तरुणाकडून रस्त्यावरील भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना बंगळुरुमधील (Man Has Sex With Street Dog) जयानगरमध्ये घडलीये. ही घटना शुक्रवारी शालिनी मैदानाजवळ घडलीये. कुत्र्यावर अत्याचार करणारा (Man Has Sex With Street Dog) तरुण 23 वर्षांचा असून तो मूळचा बिहारमधील असल्याची माहिती आहे. दरम्यान, नराधमाकडून हे कृत्य करण्यासाठी कुत्र्याचे लैंगिक अवयव धक्कादायक पद्धतीने कट केले आहेत. कुत्र्याच्या विव्हळण्याच्या आवाजाने हे कृत्य उघडकीस आलंय.
कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज आला अन् नराधम तरुण उघडा पडला
दरम्यान, त्याच वेळी रस्त्यावरुन जात असलेल्या एकाला कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज आला आणि त्याला नराधम कृत्य पाहून त्याला धक्का बसलाय. हे राग पाहून संतापलेल्या तरुणाने कुत्र्याला जखमी अवस्थेत पाहिले. त्यानंतर जवळ जाऊन पुष्टीही केली आणि नराधम तरुणाला पकडण्यासाठी आसपासच्या लोकांकडे आरडाओरडा केला.
दरम्यान, नराधमाकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्राणी प्रेमी लोकांनी नराधम तरुणाविरोधा आवाज उठवलाय. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील केलीये. नराधम तरुणांना प्राणी प्रेमी लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलंय. मीडिया रिपोर्ट्नुसार, तो माणूस दारूच्या नशेत होता. पब्लिक टीव्हीवरील एका वृत्तात असा आरोप करण्यात आला आहे की, नराधम तरुणाने गांजा आणि दारूच्या नशेत भटक्या कुत्र्यासोबत लैंगिक अत्याचार केलाय.
प्रत्यक्षदर्शी महिलेने मीडियाशी बोलताना सांगितले की, त्या नराधम तरुणाला त्या परिसरातील कुत्र्यांशी लैंगिक संबंध ठेवताना पाहण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. या महिन्याच्या सुरुवातीलाही तिने अशीच एक घटना पाहिली होती, परंतु ती त्याला पकडण्यापूर्वीच तो पुरूष पळून गेला. तिने नमूद केले की गेल्या वेळी गुन्हेगार ऑटोमधून पळून जाण्यात यशस्वी झाला होता.
कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
प्राणीप्रेमींना कुत्र्याला वाचवण्यात यश आले आहे. त्याच्यावर डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्याला पुढील उपचारांसाठी जनावरांच्या रुग्णालयात ठेवण्यात आलंय. दरम्यान, रस्त्यावरुन जात असलेल्या व्यक्तीने त्या नराधमाचे कृत्य रेकॉर्ड केले आहे. त्यासंबंधीचे पुरावे देखील त्याने पोलिसांकडे दिले आहे. याप्रकरणी आता बीएनएस संबंधित कलमांखाली जयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

