एक्स्प्लोर

शेतकऱ्याच्या 14 वर्षीय मुलाचे अपहरण, 60 लाख रुपयांची मागणी; 5 दिवसांपासून तपास पण थांगपत्ता नाही

शेतकरी कुटुंबातील साधुडे यांनी काही महिन्यापूर्वी  वाशिम पुसद मार्गावरील आपल्या शेतजमिनीची विक्री केली होती, त्यातून मोठी रक्कम साधुडे यांना मिळाली होती.

वाशिम : 60 लाख रूपयांच्या खंडणीसाठी 14 वर्षीय मुलाचं अपहरण (Kidnap) करण्यात आल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील बाभूळगाव येथे घडली आहे. विशेष म्हणजे अपहरणाच्या घटनेला तब्बल 5 दिवस उलटूनही पोराचा थांगपत्ता न लागल्याने वडिलांचे डोळे पाणावले असून आईचे डोळे लेकराच्या वाटेकडून नजर लावून बसले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत. वाशिमच्या बाभूळगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील 14 वर्षीय अल्पवयीन अनिकेत साधुडे याचं 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं आहे. अपहरण होऊन 80 तासाचा कालावधी उलटून सुद्धा पोलिसांना (Police) थांगपत्ता न लागल्याने अनिकेतच्या पालकांना मोठी चिंता लागली आहे. 

शेतकरी कुटुंबातील साधुडे यांनी काही महिन्यापूर्वी  वाशिम पुसद मार्गावरील आपल्या शेतजमिनीची विक्री केली होती, त्यातून मोठी रक्कम साधुडे यांना मिळाली होती. साधुडे कुटुंबीयांकडे शेतजमिनीतून मिळालेली मोठी रक्कम असल्याची माहिती अपहरणकर्त्यांना होती. त्यातूनच या पैशावर डोळा ठेऊन साधुडे यांचा 14 वर्षीय मुलगा अनिकेतचे अपहरण करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, अपहरणानंतर अनिकेतच्या घराबाहेर एका बंद लिफाफ्यात 5 पानी पत्रात खंडणीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे, अनिकेतच्या आई-वडिलांचे डोळे आपल्या मुलाच्या वाटेकडे लागले आहेत. माझ्या मुलाला सुखरुप माझ्याकडे पोहोचवावे, मी अपहरणकर्त्यांना त्यांची मागितलेली रक्कम द्यायला तयार आहे, असे म्हणत अनिकेतच्या वडिलांनी डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. तर, अनिकेतची आईही लेकाच्या आठवणीने आणि काळजीने व्याकूळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

अनिकेतच्या शोधार्थ पोलिसांचे पथक कार्यरत

अनिकेतच्या अपहरणाच्या 5 दिवसांनंतर देखील पोलिसानां आरोपींचा व अनिकेतचा थांगपत्ता मिळेना. विशेष म्हणजे पोलिसांनी अनिकेतच्या तपासासाठी 9 विशेष पोलीस पथके रवाना केली असून शेकडो cctv, आणि मोबाईल नंबरचा डेटा  तांत्रिकदृष्टया तपासणी केला आहे. अनिकेतच्या अपहरण करणाऱ्यांसह अनिकेतचा पत्ता न लागल्याने नेमकं अनिकेतच झालं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनिकेतच्या पालकांनी आपल्या मुलाचा शोध लागवा, याकरिता आपल्याला शेत जमिनीतून मिळालेली वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असल्याचंही माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा

'त्यांनी' हुकूमशहा हिटलरच्या क्रुरतेच्या छळछावण्या, लाखोंच्या कत्तलीचे गॅस चेंबर अजूनही जपलेत!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
धक्कादायक! दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून; दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून; दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरण साता समुद्रापार, इंग्लंडमध्ये होळीत वाल्मिक कराडसह आरोपींचा फोटो जाळला, महिलेसह चिमुकल्यांकडून निषेध
संतोष देशमुख प्रकरण साता समुद्रापार, इंग्लंडमध्ये होळीत वाल्मिक कराडसह आरोपींचा फोटो जाळला, महिलेसह चिमुकल्यांकडून निषेध
Tornadoes Hit America : तब्बल 264 किमीच्या वेगानं अमेरिकेतील 8 राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा; 10 कोटी लोक बाधित, 2 लाख घरांमध्ये बत्ती गुल
Video : तब्बल 264 किमीच्या वेगानं अमेरिकेतील 8 राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा; 10 कोटी लोक बाधित, 2 लाख घरांमध्ये बत्ती गुल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anmol Ratna ABP Majha | डिफेन्स करिअर अकादमीचे डॉ. केदार रहाणे महाराष्ट्राचे अनमोल रत्नABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 16 March 2025Sunita Williams & Wilmore To Return | सुनिता विल्यम्स आणि बूच विलमोर पृथ्वीवर परतणारABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 16 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
धक्कादायक! दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून; दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून; दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरण साता समुद्रापार, इंग्लंडमध्ये होळीत वाल्मिक कराडसह आरोपींचा फोटो जाळला, महिलेसह चिमुकल्यांकडून निषेध
संतोष देशमुख प्रकरण साता समुद्रापार, इंग्लंडमध्ये होळीत वाल्मिक कराडसह आरोपींचा फोटो जाळला, महिलेसह चिमुकल्यांकडून निषेध
Tornadoes Hit America : तब्बल 264 किमीच्या वेगानं अमेरिकेतील 8 राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा; 10 कोटी लोक बाधित, 2 लाख घरांमध्ये बत्ती गुल
Video : तब्बल 264 किमीच्या वेगानं अमेरिकेतील 8 राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा; 10 कोटी लोक बाधित, 2 लाख घरांमध्ये बत्ती गुल
Dattatray Bharne & Nitesh Rane: मंत्रीपद रुबाब करायला नसतं, काळ तुम्हाला उत्तर देईल! मुस्लिमांवर आगपाखड करणाऱ्या नितेश राणेंना अजितदादांच्या मंत्र्याने सुनावलं
मंत्रीपद रुबाब करायला नसतं, काळ तुम्हाला उत्तर देईल! मुस्लिमांवर आगपाखड करणाऱ्या नितेश राणेंना अजितदादांच्या मंत्र्याने सुनावलं
IPL 2025 Ishan Kishan : काव्या मारनने डाव लावलेला खेळाडू जबरदस्त फॉर्मात, 58 चेंडूत ठोकल्या 137 धावा, आयपीएलपूर्वी हैदराबादसाठी आनंदाची बातमी!
काव्या मारनने डाव लावलेला खेळाडू जबरदस्त फॉर्मात, 58 चेंडूत ठोकल्या 137 धावा, आयपीएलपूर्वी हैदराबादसाठी आनंदाची बातमी!
Ambadas Danve: केंद्रात, राज्यात सरकार तुमचंच, मग समाजात अशांतता कशासाठी? औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून अंबादास दानवे कडाडले, म्हणाले..
केंद्रात, राज्यात सरकार तुमचंच, मग समाजात अशांतता कशासाठी? औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून अंबादास दानवे कडाडले, म्हणाले..
मोठी बातमी ! पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर हल्ला, बस जळून खाक; पाकचे 90 जवान ठार
मोठी बातमी ! पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर हल्ला, बस जळून खाक; पाकचे 90 जवान ठार
Embed widget