Budh Asta 2025 : 24 तासांत बुध ग्रहाचा होणार अस्त, 17 मार्चपासून 'या' 3 राशींना सावधानतेचा इशारा; धनहानीसह होणार प्रचंड नुकसान
Budh Asta 2025 : पंचांगानुसार, बुध ग्रह 17 मार्च 2025 रोजी मीन राशीत अस्त होणार आहे. तर, पुढचे 20 दिवस तो याच स्थितीत असणार आहे.

Budh Asta 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध (Mercury) ग्रहाला बुद्धीचा कारक ग्रह मानलं जातं. पंचांगानुसार, बुध ग्रह 17 मार्च 2025 रोजी मीन राशीत अस्त होणार आहे. तर, पुढचे 20 दिवस तो याच स्थितीत असणार आहे. या दरम्यान काही राशींच्या अडचणीत वाढ होऊ शकते. करिअरमध्ये अनेक उतार-चढाव निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, बुध ग्रहाच्या अस्ताने कोणकोणत्या राशींना (Zodiac Signs) सावधानतेची गरज आहे ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीचा बुध हा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे बुधाच्या अस्ताचा थेट परिणाम मिथुन राशीवर होणार आहे. बुध ग्रह सध्या कर्म भावात आहे. त्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच, तुम्हाला नवीन नोकरी शोधण्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यापारी वर्गातील लोकांना व्यवसात नुकसान होऊ शकतं.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ फार कठीण असणार आहे, या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. अन्यथा नातेसंबंध दुरावू शकतात. ऑफिसमधल्या कोणत्याही वादविवादात सहभागी होऊ नका. प्रकरण तुमच्या अंगावर बेतू शकतं. तसेच, मुलांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना सावधानता बाळगा. या काळात पैसे गुंतवू नका.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
बुध ग्रह वृश्चिक राशीच्या पंचम चरणात अस्त होणार आहे. त्यामुळे या राशीच्या मुलांना या काळात सावध राहण्याची गरज आहे. या काळात विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता कमी दिसून येईल. त्यामुळे याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर दिसून येईल. तसेच, करिअरच्या बाबतीत देखील तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल. या काळात कोणताही मोठा निर्णय एकट्याने घेऊ नका. नीट विचारपूर्वक तसेच, घरातील ज्येष्ठ मंडळींना विश्वासात घेऊन निर्णय घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Gochar 2025 : अवघ्या 10 दिवसांत दोन वेळा बदलणार शनीची चाल, 5 राशींचं आयुष्य 360 डिग्री बदलणार; करिअरला लागणार यूटर्न
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
