एक्स्प्लोर

Video: लाज वाटली पाहिजे, देशाला कृषिप्रधान म्हणता? शेतकऱ्याच्या बहिणीने सांत्वनासाठी आलेल्या मंत्र्यांनाच सुनावलं

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजाच्या शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नांगरे यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली.

बुलढाणा : राज्य पुरस्कारप्राप्त शेतकरी (Farmer) कैलास नांगरे यांनी दोन दिवसांपूर्वी आपलं जीवन संपवलं. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसाठी हक्काचं पाणी मिळावं अशी मागणी करत त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय. या घटनेनं राज्यभरातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त करत संतापही व्यक्त केला. त्यातच, कैलास नांगरे यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला मंत्री महोदयांसह दिग्गजांची उपस्थिती होती. त्यावेळी, कैलास यांच्या बहिणीने आपला मनातील संताप बोलून दाखवला. लाज वाटली पाहिजे, पालकत्व येत नसेल तर पालकत्व का स्वीकारता? देशाला कृषिप्रधान म्हणता? लाज नाही वाटत. माझ्या भावाच्या नावासमोर आत्महत्या नाही तर बलिदान हा शब्द लावण्यात यावा, अशा शब्दात पीडित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या बहिणीने मंत्री महोदयांनाच सुनावले आहे. बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील आत्महत्या केलेल्या युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या भगिनी सत्यभामा नागरे यांनी मंत्री प्रतापराव जाधव आणि आ.सुनील कायंदे यांच्या समोर राजकारण्यांना खडे बोल सुनावले.  

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नांगरे यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली. कैलास नांगरे यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज त्यांच्या मूळ गावी शिवनी आरमाळ येथे संपन्न झाला. यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, महिला शेतकरीही उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि स्थानिक आ. सुनील कायंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी कैलास नागरे यांच्या भगिनी सत्यभामा नागरे यांनी राजकारण्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. "माझ्या भावासमोर आत्महत्या हा शब्द वापरू नका, तर बलिदान हा शब्द वापरावा... असं भावनिक आवाहनही सत्यभामा नागरे यांनी केलं. 

माझ्या भावाला हे माहित होतं की या देशात बलिदान दिल्याशिवाय काहीही होत नाही आणि म्हणून त्याने शेतकऱ्यांसाठी बलिदान दिलेलं आहे. देशाला राजकारणी हे कृषी प्रधान म्हणतात, यांना लाजा वाटायला पाहिजे की, कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करतो आणि तेही पाण्यासाठी, अशा शब्दात बहिणीने आपल्या भावाच्या मृत्यूनंतर तीव्र भावना व्यक्त केल्या. आपले पालकमंत्री यांना वारंवार माझ्या भावाने विनंती केली. मात्र, अशा पालकमंत्र्यांना पालकत्व स्वीकारता येत नसेल तर कशाला पालकत्व स्वीकारतात? लाजा वाटल्या पाहिजे, असे खडे बोलही सत्यभामा नागरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोरच सुनावले.

दरम्यान, शेतकरी कैलास नांगरे यांच्या रक्षा विसर्जन कार्यक्रमादरम्यान सत्यभामा नागरे यांनी राजकारण्यांना खडे बोल सुनावल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि स्थानिक आ.सुनील कायंदे हे खाली मान घालून ऐकत राहिल्याचं दिसून आलं. दु:खाच्या प्रसंगी सांत्वन करायला गेलेल्या नेतेमंडळींनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या बहिणीने चांगलीच चपराक लगावल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे. 

हेही वाचा

मोठी बातमी ! पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर हल्ला, बस जळून खाक; पाकचे 90 जवान ठार

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
भाजपच्या काळात आमच्याकडे दुर्लक्ष, काँग्रेससोबत असताना योग्य जागा मिळत होत्या, आठवलेंची महायुतीवर उघड नाराजी   
भाजपच्या काळात आमच्याकडे दुर्लक्ष, काँग्रेससोबत असताना योग्य जागा मिळत होत्या, आठवलेंची महायुतीवर उघड नाराजी   
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचीच सत्ता येणार, 10 उमेदवार बिनविरोध, शेकापचे बाबासाहेब पाटीलही भाजप पुरस्कृत पॅनेलमध्येच
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचीच सत्ता येणार, 10 उमेदवार बिनविरोध, शेकापचे बाबासाहेब पाटीलही भाजप पुरस्कृत पॅनेलमध्येच
Eknath Shinde: रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Embed widget