एक्स्प्लोर
Raj Thackeray Kumbh Mela: राज ठाकरेंना फक्त हिंदू धर्म दिसतो, बकरी ईदला मोहम्मद अली रोडवर वाहणारं लाल पाणी दिसत नाही; नितेश राणे कडाडले
prayagraj kumbh mela 2025: प्रयागराज येथे नुकताच कुंभमेळा पार पडला. यावेळी देशातील कोट्यावधी भाविकांनी प्रयागराज येथील संगमावर शाही स्नानाचा आनंद घेतला.
Nitesh Rane & Raj Thackeray
1/10

कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी जाणाऱ्यांची टिंगल उडवणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर भाजपचे नेते तुटून पडले आहेत. प्रवीण दरेकर, तुषार भोसले यांच्यानंतर आता राज्याचे मत्स्य व बंदर विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.
2/10

राज ठाकरे याना फक्त हिंदू धर्म दिसतो. रमजानच्या काळात आता मोहम्मद अली रोडला जा किंवा बकरी ईदच्यावेळी रस्त्याने वाहणारे लाल पाणी पाहावे, असा सल्ला नितेश राणे यांनी मनसेप्रमुखांना दिला.
3/10

त्यावेळी राज ठाकरे का बोलत नाही? त्यांनी मागे गुजरात दौरा केला होता. आता त्यांनी एकदा प्रयागराजचा दौरा करावा, असे नितेश राणे यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4/10

मी आणि माझ्या आईने कुंभमेळ्यात स्नान केले, आम्हाला कसलाच त्रास जाणवला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी आमच्या आस्थेबाबत काहीही बोलू नये, असे नितेश राणे यांनी म्हटले.
5/10

मुंबईत आमच्या पदाधिकाऱ्यांची मेळावा बैठक लावली होती. त्यात काही शाखेचे पदाधिकारी गैरहजर होते आणि जे गैरहजर होते त्यांची हजेरी मी घेतली. त्यावेळी प्रत्येकाला विचारले असता त्यातल्या अनेकांनी आपली आपली कारणे दिली. त्यातल्या बहुतांश लोकांनी कुंभमेळ्याचे कारण पुढे केले. त्यामुळे मुळात तुम्ही पाप करताच कशाला? असा प्रश्न मी त्यांना केला.
6/10

बाळा नांदगावकर ही कमंडलुमधून पाणी घेऊन आले. मी त्यांना म्हटले, हड मी ते पिणार नाहीये. सोशल मीडियावर माणसं-बाया अंग घासून अंघोळ करत आहेत आणि आमचे बाळा नांदगावकर पाणी प्यायला देत आहेत. मला सांगा कोण पिणार ते पाणी, नुकताच कोरोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहेत. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? , असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.
7/10

प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीच्या संगमावर गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधी लोकांनी महाकुंभात पवित्र स्नान केले आहे. मात्र, या पाण्यात मोठ्याप्रमाणात विष्ठेत असणारे जिवाणू (एफसी) आढळल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) दिली आहे. सीपीसीबीने हा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) मुख्य खंडपीठासमोर सादर केला होता.
8/10

भाविक जिथे स्नान करत आहेत, त्या सर्व ठिकाणच्या पाण्याचे नमुने 12 आणि 13 जानेवारीला जमा करण्यात आले होते. त्यामध्ये फेकल कॉलिफॉर्म हे मानवी प्राण्याच्या विष्ठेत असणारे जिवाणू सापडले होते.
9/10

संगमाच्या वरील भागातून स्नानासाठी ताजे पाणी सोडले जाते. तरीही याठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे. काही भाविकांकडून नदीच्या किनाऱ्यावर कचरा आणि विष्ठा केल्याचेही प्रकार समोर आले होते.
10/10

तब्बल 144 वर्षांनी एकदा येणाऱ्या महाकुंभचा पवित्र मुहूर्त साधत गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास तीन कोटी भाविकांनी प्रयागराजमध्ये स्नान केले आहे. इतक्या प्रचंड संख्येने लोक नदीत स्नान करत असल्याने गंगेच्या पाण्यात एफसीचे प्रमाण वाढल्याचे संबंधित अहवालात म्हटले आहे. महाकुंभदरम्यान शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता.
Published at : 10 Mar 2025 01:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























