तर माझं रक्त खवळतं, भर रस्त्यात ना*डा करून ठोकेन, पदावर असल्याने सहनशील; सीएम रेवंत रेड्डींचा कोणाला धमकीवजा इशारा?
मी म्हणालो तर तुम्हाला मारहाण करायला लाखो लोक रस्त्यावर येतील. माझ्या पदामुळे मी सहनशील राहिलो. मात्र, मी जे काही करेन ते कायद्याच्या कक्षेत राहून करेन, असे त्यांनी पुन्हा सांगितले.

Revanth Reddy : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे की, जे सोशल मीडियात आपल्या विरोधात अपशब्द वापरतील त्यांना विवस्त्र केले जाईल, रस्त्याच्या मधोमध परेड केली जाईल आणि ठोकून काढलं जाईल. राज्यातील दोन महिला पत्रकारांच्या अटकेनंतर रेड्डी यांचे हे वक्तव्य आले आहे. त्यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप आहे. रेड्डी विधानसभेत म्हणाले की, मी मुख्यमंत्री आहे म्हणून मी गप्प आहे असे समजू नका. मी नाXडा करून ठोकेन. मी म्हणालो तर तुम्हाला मारहाण करायला लाखो लोक रस्त्यावर येतील. माझ्या पदामुळे मी सहनशील राहिलो. मात्र, मी जे काही करेन ते कायद्याच्या कक्षेत राहून करेन, असे त्यांनी पुन्हा सांगितले.
पण आमच्या कुटुंबीयांना का लक्ष्य केले जात आहे?
रेड्डी म्हणाले की, आम्ही सार्वजनिक जीवनात आहोत आणि टीकेसाठी तयार आहोत, पण आमच्या कुटुंबीयांना का लक्ष्य केले जात आहे? पत्रकारितेच्या नावाखाली सोशल मीडियावर अपमानास्पद मजकूर पसरवण्याची संस्कृती जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत आपण गप्प बसणार नसल्याचे रेवंत रेड्डी यांनी जाहीर केले आहे.
रेड्डी यांच्या भाषणातील चार प्रमुख मुद्दे...
1. बीआरएस कार्यालयात व्हिडिओ शूट केल्याचा आरोप
10 मार्च रोजी पोलिसांनी रेवती पोगदंडा आणि तिची सहकारी संध्या उर्फ तन्वी यादव यांच्याविरुद्ध रेड्डी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यानंतर 12 मार्च रोजी पोलिसांनी 'पल्स न्यूज' नावाचे यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या दोन महिलांना अटक केली. दोन्ही महिलांनी बीआरएस कार्यालयात व्हिडिओ शूट केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
2. अशा पोस्ट जर बीआरएस नेत्यांच्या विरोधात असतील तर ते गप्प बसतील का?
बीआरएसवर हल्ला करताना, सीएम रेड्डी यांनी विचारले, “माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांबद्दल अपमानास्पद भाषा पोस्ट करण्यात आली. "माझ्या कुटुंबातील महिलांविरोधात सोशल मीडिया पोस्टमध्ये वापरण्यात येणारी भाषा पाहून माझे रक्त खवळलं आहे."
3. YouTube चॅनेल चालवणाऱ्यांना पत्रकार मानले जाणार नाही
सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असेही सीएम रेड्डी म्हणाले. त्यांनी इशारा देत सांगितले की, जर कोणी मुखवटा घालून खोटी बातमी पसरवली तर आम्ही त्यांचा मुखवटा काढून त्यांना नग्न करू. युट्युब चॅनल सुरू करून कुणालाही पत्रकार मानता येणार नाही, असेही ते म्हणाले.
4. पत्रकारांची यादी तयार करण्याचे आदेश
रेवंत रेड्डी यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्री डी. श्रीधर बाबू आणि माहिती आणि जनसंपर्क मंत्री पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी यांना मान्यताप्राप्त पत्रकारांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, 'यादीत ज्यांचे नाव नाही ते पत्रकार नसून गुन्हेगार आहेत. गुन्हेगारांना जशी वागणूक दिली जाते तशीच वागणूक त्यांना दिली जाईल.
आता संपूर्ण प्रकरण समजून घ्या...
पोलिसांनी सांगितले की हे प्रकरण बीआरएस मुख्यालयात चित्रित केलेल्या अपमानास्पद व्हिडिओशी संबंधित आहे. यामध्ये पल्स डिजिटल न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलच्या व्यवस्थापकीय संचालक रेवती पोगदंडा आणि सहयोगी तन्वी यादव यांना अटक करण्यात आली आहे. भारत राष्ट्र समिती (BRS) तेलंगणातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्याचे प्रमुख माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला आहे. काँग्रेसच्या तक्रारीत X वर व्हिडिओ प्रसिद्ध होत असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओमध्ये पल्स न्यूज रिपोर्टर एका व्यक्तीची मुलाखत घेत आहे. ती व्यक्ती मुख्यमंत्र्यांना आक्षेपार्ह बोलत आहे. अशा व्हिडिओ पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

