Maharashtra Live Updates: पहिली ते आठवीच्या परीक्षांवरुन वाद, नेमका काय निर्णय होणार?
Maharashtra Live updates: राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा. बीडमधील गुंड सतीश भोसले उर्फ खोक्या भाईबद्दल नवी माहिती.
LIVE

Background
संजय राऊतांनी माझं कौतुक केलं असल्यास मी त्यांना धन्यवाद देतो: उदय सामंत
राज्यात जातीय सलोखा राखण्यासाठी सगळ्याची प्रयत्न करण्याची गरज आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे प्रेम या देशावर असलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्र आणि हा देश आहे. त्यामुळे देशाला पाण्यात बघणं, प्रेम न करणं ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. धार्मिक गोष्टीत न जाता सर्वांनी एकत्र राहून काम केलं पाहिजे. त्यामुळे राज्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे, की कुठल्याही जाती धर्मात तेढ निर्माण होऊ नये. असा प्रकार झाल्यास तो मिटवणे, त्यासाठी मी पालकमंत्री आहे. संजय राऊतांनी माझं कौतुक केलं असल्यास मी त्यांना धन्यवाद देतो.
महाराष्टातील सिंधुदुर्ग आणि पालघर येथे तेलसाठे सापडले आहेत ते यूएई सारखे सापडले नाहीत. समुद्रात तेलाचा तवंग सापडल्याने जाणवत की तिथे तेल असू शकते. ज्यावेळी तिथे तेल आहे हे सिद्ध होईल, तसेच ते किती प्रमाणावर आहे हे समजेल राज्याचा किती कायापालट होईल हे समजेल. मात्र याचा शास्त्रीय अभ्यास झाल्यावर प्रतिक्रिया देऊ असं उदय सामंत यांनी सांगितलं.
वाशिम शहर पोलिसांनी आज कारवाई करत कत्तलीसाठी जाणाऱ्या 39 गोधन (गाय,बैल) आणि तीन म्हशी सह पाच वाहनावर कारवाई
वाशिम
वाशिम शहर पोलिसांनी आज कारवाई करत कत्तलीसाठी जाणाऱ्या 39 गोधन (गाय,बैल) आणि तीन म्हशी सह पाच वाहनावर कारवाई केली आहे. आज सकाळच्या सुमारास काही हिंदुत्ववादी संघटनाद्वारे माहिती प्राप्त झाली..यवतमाळ वरून वाशिम इथं मोठ्या प्रमाणात गोधन कत्तली साठी 5 विविध वाहनां मधून वाशिम इथं दाखल होतंय.. यवतमाळच्या विविध बाजार समिती मधून बनावट पावती द्वारे हे सर्व गोधन विक्री करिता येणार आहे..या बाबत वाशिम पोलिसांना माहिती प्राप्त होताच..39 गोधन आणि 3 म्हशी सह वाहन ताब्यात घेण्यात आली असून पोलीस सर्व वाहण गोधन कुणी विक्री केली या बाबत तपास करत आहे.. तर हिंदुत्ववादी संघटने कडून इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी 10 हजार पेक्षा अधिक जनावरांची खरेदी विक्री कशी झाली या बाबत चौकशी करण्या साठी मागणी करत आहेत..
मुंबई गोवा हायवे वरील सुकेळी खिंडीतील अपघातात कंटेनर मध्ये अडकून पडलेल्या वाहन चालकाला रेस्क्यू टीम कडून तब्बल 2 तासांच्या प्रतिक्षेनंतर सुखरूप बाहेर
रायगड ब्रेकिंग
मुंबई गोवा हायवे वरील सुकेळी खिंडीतील अपघातात कंटेनर मध्ये अडकून पडलेल्या वाहन चालकाला रेस्क्यू टीम कडून तब्बल 2 तासांच्या प्रतिक्षेनंतर सुखरूप बाहेर
वाहन चालक गंभीर जखमी
सुदैवाने कोणती जीवितहानी टळली
Anchor - मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत एक सिमेंट वाहतूक करणारा कंटेनर पलटी होऊन अपघात घडला होता या अपघातात वाहन चालक कंटेनरच्या केबिन मध्ये अडकून पडला होता.या अडकून पडलेल्या चालकाला सह्याद्री रेस्क्यू टीम कडून तब्बल 2 तासानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. वाहन चालक बालंबाल बचावला असला तरी त्याला या अपघातात गंभीर मार लागल्याने नागोठणे जवळीक शासकीय रुग्णालयात उपचारा करिता हलवण्यात आलं आहे.
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठी आहे का ? हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्यावेळीं लहान मुलगी पडली आणि सुरू झाला गोंधळ
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठी आहे का ? हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्यावेळीं लहान मुलगी पडली आणि सुरू झाला गोंधळ ..
V/O - पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या बाहेर लावलेला पंखा केवळ मंत्र्यांसाठी आहे का ? असा थेट सवाल जळगावच्या महिला भाविकाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना केला. जळगाव येथील एका महिला भाविकाची लहानशी मुलगी खेळताना पडल्यानंतर ही महिला आपल्या लहान मुलीला पंख्याखाली घेऊन उभारली. यावेळी पोलिसांनी महिलेला मंत्री येत असल्याने बाजूला सरकावले. याबाबत महिलेने थेट मुश्रीफांना विचारणा केली. यावर हसन मुश्रीफ यांनी दिलगिरी व्यक्त केली. व संबंधित पोलिसांशी बोलायला सांगितले. मात्र पोलीस तात्काळ निघून गेल्याचे या महिलेने सांगितले . यामुळे संतप्त भाविकांनी आपली नाराजी व्यक्त केली
पाणी टंचाईचे भीषण वास्तव पाणी भरण्यासाठी गेलेला शाळकरी मुलगा विहीरीत पडून गंभीर जखमी
पाणी टंचाईचे भीषण वास्तव पाणी भरण्यासाठी गेलेला शाळकरी मुलगा विहीरीत पडून गंभीर जखमी
ठाणे . मुंबईसह ठाणे व भिवंडी महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱा शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाईचा सामना गाववकऱ्यांना करावा लागत असून शाळा सुटल्यानंतर इयत्ता 8 वीत शिकणाऱा कृष्णा सन्या शिद हा 14 वर्षीय मुलगा गावात पाणी टंचाई असल्याने विहीरीवर गेला असता पाणी भरत असताना त्याचा अचानक तोल गेल्यानं तो विहीर पडला ही भीषण वास्तव समोर आणणारी घटना शहापूर तालुक्यातील माळ ग्रामपंचायत हद्दीतील शिदपाडा येथील विहरीत घडली असून गेल्या काही वर्षांत या माळ ग्रामपंचायत मध्ये पाण्यासाठी अनेक बळी गेल्याचं गावकरी सांगत आहेत
विशेष म्हणजे ही विहीर कोरडी असल्याने त्याला विहीरीतील दगडांचा मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला विहीरीवर इतर लोक देखील पाणी भरण्यासाठी आले होते कृष्णा खाली पडल्याचे लक्ष्यात येताच दोरीच्या सहाय्याने त्याला लगेच बाहेर काढले व उपचारासाठी शासकीय रूग्णालयाला रवाना केले उपचारा दरम्यान समोर आले कि त्याच्या डोक्याला व अंगाला मार लागला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना १३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

