Virat Kohli on BCCI Family Rule : जिवाभावाच्या माणसांची 'ताटातूट'! IPL मधील 'तो' नियम विराट कोहलीच्या जिव्हारी लागला, बीसीसीआयविरोधात आवाज उठवत म्हणाला...
आयपीएल 2025 साठी बनवलेले नवीन नियम आणि बीसीसीआयने लादलेले निर्बंध खेळाडूंना काही पसंत पडत नाहीत.

Virat Kohli on BCCI Family Rule : आयपीएल 2025 साठी बनवलेले नवीन नियम आणि बीसीसीआयने लादलेले निर्बंध खेळाडूंना काही पसंत पडत नाहीत. आता विराट कोहलीने याविरुद्ध आवाज उठवला आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार, आता कोणत्याही खेळाडूच्या कुटुंबातील सदस्यांना आयपीएल 2025 दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करता येणार नाही. जर कुटुंबातील सदस्यांना सराव किंवा सामना पहायचा असेल तर ते हॉस्पिटॅलिटी बॉक्समध्ये बसू शकतात.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली बीसीसीआयच्या नवीन नियमांवर नाराज दिसला. त्यांचे असे मत आहे की असे निर्णय घेणाऱ्या लोकांना दूर ठेवले पाहिजे. तो म्हणाला की, जेव्हा खेळाडू दौऱ्यावर कठीण काळातून जात असतो, तेव्हा त्यांच्या कुटुंबाची त्यांना साथ पाहिजे असते. 36 वर्षीय किंग कोहली अलीकडेच 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता आणि त्याने या स्पर्धेत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.
खरं तर, विराट कोहलीने आरसीबी इनोव्हेशन लॅब इंडियन स्पोर्ट्स समिट दरम्यान म्हणाला की, कुटुंब आपल्यासोबत असणे खूप महत्वाचे आहे. कुटुंब असल्याने मैदानावर कठीण काळातून जात असलेल्या खेळाडूंला मैदानाबाहेर साथ मिळते आणि संतुलन निर्माण होण्यास मदत होते.
तो पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करत असतो, परंतु त्यावेळी कुटुंबाचा एक आधार इतर सर्व तणावांपासून मुक्त होण्यास मदत करतो. आणि बाहेर कितीही समस्या आल्या तरी घरी आल्यानंतर सगळं काही सामान्य वाटतं. मी अशी कोणतीही संधी सोडणार नाही जिथे मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
सोप्या शब्दांत सांगायचे तर, विराटने कुटुंबातील सदस्यांबाबत बीसीसीआयच्या नियमाला विरोध केला आहे. बरं, तो सध्या आरसीबी कॅम्पमध्ये सराव करत आहे. आरसीबीचा पहिला सामना 22 मार्च रोजी केकेआर विरुद्ध होणार आहे, जो आयपीएल 2025 चा पहिला सामना देखील असेल.
बीसीसीआयचा कुटुंब नियम काय आहे?
जेव्हा भारतीय संघ बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता, तेव्हा त्यांना 3-1 ने पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर, बीसीसीआयने कठोर नियम बनवले. ज्यामध्ये असे म्हटले होते की, खेळाडू संपूर्ण दौऱ्यादरम्यान त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि पत्नींसोबत प्रवास करू शकणार नाहीत.
जेणेकरून त्यांच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही. जर तो 45 दिवसांपेक्षा जास्त काळ दौऱ्यावर असेल तर त्याचे कुटुंब काही आठवड्यांनंतरच त्याच्यासोबत येऊ शकेल आणि त्याचे कुटुंब 14 दिवसांपेक्षा जास्त काळ राहू शकणार नाही.
छोट्या दौऱ्यांवर, कुटुंबे खेळाडूंसोबत एक आठवड्यापर्यंत राहू शकतात. जर एखाद्या खेळाडूला त्याच्या कुटुंबासह किंवा स्वतंत्रपणे प्रवास करायचा असेल तर त्याला मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीच्या अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

