Ambadas Danve: केंद्रात, राज्यात सरकार तुमचंच, मग समाजात अशांतता कशासाठी? औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून अंबादास दानवे कडाडले, म्हणाले..
Ambadas Danve: कोरटकर, सोलापूरकर याच्या विरोधात भाजप का आंदोलन करत नाही? मुख्यमंत्री फडणवीस हाऊसमध्ये बोलले होते अटक करणार. मात्र त्यांनी अटक केली का? असा सवाल करत अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb) हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb) हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला आहे. दरम्यान याच मुद्यावरून आता राजकारण देखील तापले आहे. महाराजांनी प्रतापगडाजवळ अफजलखानची कबर का ठेवली? इतिहास लोकांना माहिती पाहिजे, जे स्वराज्यावर आले त्यांना इथचं गाढलं. तसंच औरंगजेबलाही मराठ्यांच्या विरोधात आला त्यालाही इथे गाढलं हा इतिहास आहे. आम्ही कबर असावी, की नसावी याबाबत आमचं काही मत नाही. मूळात केंद्रात सरकार याचं आहे. एकीकडे संरक्षण द्यायचं आणि दुसरीकडे विरोध करायचा ही दुहेरी भूमिका का? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी टीका केली आहे.
प्रशांत कोरटकर असो किंवा राहुल सोलापूरकर याच्या विरोधात भाजप का आंदोलन करत नाही? मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) हाऊसमध्ये बोलले होते अटक करणार. मात्र त्यांनी अटक केली का? हॅलोच्या जागी वंदेमातरम् बोला असे मुनगंटीवार बोलले होते त्याचं काय झालं? असा सवाल ही त्यांनी यावेळी केला आहे.
केंद्रात, राज्यात सरकार तुमचंच, मग समाजात अशांतता कशासाठी?
औंरगजेबची कबर संदर्भात छत्रपती संभाजी नगरमध्ये तसं वातावरण नाही. काही हिंदु संघटना जरूर काही मागणी करत आहेत. मात्र राज्यात आणि केंद्रात त्यांचंचं सरकार आहे. एकीकडे केंद्राकडून निधी दिला जातो. दुसरीकडे आंदोलनाच हाक दिली जात आहे. म्हणजे दोन्ही बाजूने ढोल वाजवले जात आहे. औरंगजेबच्या विचाराचे विरोध नक्कीच आहे. मुख्यमंत्री त्यांचेच आहे, एक पत्र लिहा आणि काढून टाका समाजात अशांतता कशासाठी? असा सवाल ही अंबादास दानवे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. बाबरी पाडताना ते आमचे लोक नाही म्हणणारे हेच आहेत. महाराष्ट्रात अराजकता पसरवण्याचा हा डाव असल्याचे ही अंबादास दानवे म्हणाले. दरम्यान, नितेश राणे यांच्याविषयी बोलणं म्हणजे आपलं तोंड खराब करण्यासारखं आहे. ते मेच्युअर नाहीत. अशी बोचरी टीका ही अंबादास दानावे यांनी नितेश राणेंवर केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

