NZ vs PAK 1st T20I : न्यूझीलंडसमोर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या 'इज्जतीचा फालुदा'! 8 फलंदाजांनी केल्या 15 धावा, मग संघाची धावसंख्या किती?
New Zealand vs Pakistan 1st T20I : ना बाबर, ना रिझवान... त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा एकदा पाकिस्तानच्या इज्जतीचा फालुदा झाला.

New Zealand vs Pakistan 1st T20I : ना बाबर, ना रिझवान... त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा एकदा पाकिस्तानच्या इज्जतीचा फालुदा झाला. दोन्ही संघांमधील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानी संघाची अवस्था खूपच वाईट झाली. कोणताही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही आणि कोणताही गोलंदाज आपली छाप सोडू शकला नाही, त्यामुळे पाकिस्तानी संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच वेळी, न्यूझीलंड संघाने मालिकेची सुरुवात दणदणीत विजयाने केली.
न्यूझीलंडसमोर पाकिस्तानी संघाने टेकले गुडघे...
या सामन्यात सुरुवातीपासूनच न्यूझीलंड संघ वर्चस्व गाजवत होता. सर्वप्रथम त्यांनी नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यानंतर, पहिल्याच षटकापासून न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कहर केला. दोन्ही पाकिस्तानी सलामीवीरांना खाते उघडता आले नाही. यानंतर, विकेट्स पडत राहिल्या आणि संपूर्ण पाकिस्तान संघ 18.4 षटकांत 91 धावांवर ऑलआउट झाला. ज्या पाकिस्तानच्या न्यूझीलंडमधील आतापर्यंतचा सर्वात कमी धावा आहेत. या डावात पाकिस्तानकडून खुसदिल शाहने सर्वाधिक 32 धावा केल्या. तर, जहांदाद खानने 17 धावांची खेळी केली.
Pacers fire New Zealand to an emphatic win in their series opener against Pakistan 👊#NZvPAK 📝: https://t.co/MXgTqAX7fy pic.twitter.com/7knxdHY2C5
— ICC (@ICC) March 16, 2025
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानशिवाय खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने या सामन्यात एक-दोन नव्हे तर तीन नवीन चेहऱ्यांनी पदार्पण केले. पण न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीसमोर, त्या तिघांनाही पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना मिळून 10 धावाही करता आल्या नाहीत. पाकिस्तानच्या 8 फलंदाजांनी मिळून फक्त 15 धावा केल्या. दुसरीकडे, न्यूझीलंडकडून जेकब डफीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. काइल जेमीसननेही त्याला चांगली साथ दिली आणि 4 षटकांत 8 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय, ईश सोधीने 2 आणि झाचेरी फौल्क्सने 1 विकेट घेतली.
किवी संघाचा फक्त 61 चेंडूत दणदणीत विजय
या सामन्यात न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 92 धावांचे लक्ष्य मिळाले. किवी फलंदाजांना हे साध्य करण्यासाठी अजिबात वेळ लागला नाही. त्यांनी फक्त 10.1 षटकांत म्हणजेच 61 चेंडूत लक्ष्याचा पाठलाग केला. या डावात न्यूझीलंडकडून टिम सेफर्टने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 29 चेंडूत 151.72 च्या स्ट्राईक रेटने 44 धावा केल्या ज्यामध्ये 7 चौकार आणि 1 षटकार होता. त्याच वेळी, फिन अॅलन 17 चेंडूत 29 धावा करून नाबाद राहिला. टिम रॉबिन्सननेही 15 चेंडूत 18 धावांची नाबाद खेळी केली. पाकिस्तानी संघाला फक्त 1 विकेट घेता आली.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
