एक्स्प्लोर

Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी

Khatron Ke Khiladi 14 Winner: टॉप 3 मध्ये पोहोचलेल्या करण वीर मेहरानं कृष्णा श्रॉफ आणि गश्मीर महाजनी यांना कडवी टक्कर दिली आणि ट्रॉफी आपल्या नावे केली.

Khatron Ke Khiladi 14 Winner: खतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi) सीझन 14 चा विजेता अखेर जाहीर करण्यात आला आहे. यावेळी अभिनेता करण वीर मेहरा (Karan Veer Mehra) KKK सीझन 14 चा विजेता ठरला आहे. टॉप 3 मध्ये पोहोचलेल्या करणनं कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) आणि गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) यांना कडवी टक्कर दिली आणि ट्रॉफी आपल्या नावे केली. करणनं आपला विजयाचा क्षण संपूर्ण टीमसोबत साजरा केला. विजयी ठरलेल्या करण मेहराला 20 लाख रुपये रोख आणि एक नवीकोरी कारही देण्यात आली.

KKK सीझन 14 चा विजेचा करण वीर मेहरा 

खतरों के खिलाडी सीझन 14 मध्ये विजय मिळवल्यानंतर करणनं माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संपूर्ण शोमध्ये त्या होस्ट रोहित शेट्टीचा आगळावेगळा अंदाज खूप भावल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर त्यानं आपल्या संपूर्ण सीझनमधल्या प्रवासाबाबत सांगितलं. त्यानं सांगितलं की, त्याला प्राण्यांची तशी फारशी भिती वाटत नाही. पण, स्टंट्स दरम्यान इलेक्ट्रिक शॉक्सला तो खूप घाबरला. दरम्यान, खतरों के खिलाडी सीझन 14 चे फायनलिस्ट शालीन भनोट आणि अभिषेक कुमार हेदेखील होते. 

खतरों के खिलाडी मधील त्याच्या प्रवासाचं वर्णन करताना, करण म्हणाला की, यंदाच्या सीझनमधला माझा प्रवास सुंदर आणि अतिशय अद्भुत होता, किंवा तुम्ही आणखी काही सकारात्मक शब्द जोडू शकता. जेव्हा मी शूटिंगसाठी उड्डाण करत होतो, तेव्हा मला खात्री होती की, मी चांगली कामगिरी करेन. दरम्यान, जेव्हा मी रोमानियाला पोहोचलो, त्यावेळी मला आश्चर्य वाटलं की, इतर स्पर्धकांनी किती चांगली तयारी केली होती. तेव्हा मी नर्व्हस झालो, कारण प्रत्येकाला शोमध्ये जिंकायचं होतं. मला वाटतं की, त्यांच्यापैकी प्रत्येकजण माझ्यासाठी समान स्पर्धा होती.

मला रोहितसारखं बनायचंय... 

KKK सीझन 14 रोहित शेट्टीनं होस्ट केला. त्याबाबत बोलताना विजेता करण म्हणाला की,आजवर त्यांनी जे काही सांगितलं, जे काही केलं किंवा केलं नाही ते सर्व माझ्याकडे राहील. रोहित सरांवर माझं खूप खूप क्रश आहे. मला त्याच्यासारखं व्हायचं आहे, मला त्याच्यासारखाच दृष्टिकोन स्वीकारायचा आहे. ते खूपच संयमी आहेत. मला त्याच्याबद्दल खूप आदर आहे.

'बिग बॉस 18' मध्ये दिसणार करण वीर मेहरा... 

KKK सीझन 14 चा विजेता करण वीर मेहरासह फायनलमध्ये कृष्णा श्रॉफ, शालीन भानोत, गश्मीर महाजनी आणि अभिषेक कुमार होते. पण ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यात करणला यश मिळालं. यासोबतच करणला आलिशान कार आणि रोख रक्कम बक्षिस म्हणून मिळाली. करण वीर मेहरा आता सलमान खान होस्ट करत असलेला रिॲलिटी शो 'बिग बॉस 18' मध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार असल्याचं बोलंलं जात आहे. मात्र, करणनं यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

शंभरदा नाकारलं 'त्याला', पण अखेर स्विकारावं लागलंच; 2003 मध्ये पदार्पण, 2019 मध्ये दिला हीट चित्रपट, आजही बॉलिवूड गाजवतोय 'हा' स्टार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidharbha Farmer News : पूर्व विदर्भातील 35 हजार शेतकऱ्यांचे 284 कोटींचे धानाचे चुकारे रखडलेSharad Pawar on Madhukar Pichad Demise : जुना सहकारी हरपला, मधुकर पिचडांच्या निधनावर शरद पवार भावूकChandrashekhar Bawankule : Raj Thackeray आणि आमचे विचार जुळतात, बावनकुळेंचं सूचक वक्तव्यDevendra Fadnavis on Raj Thackeray : पालिका निवडणुकीत जिथं शक्य तिथं राज ठाकरेंना सोबत घेणार :फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
Devendra Fadnavis & Raj Thackeray: भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेत वाटा देणार का? खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेत वाटा देणार का? खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
Embed widget