Mumbai News : 30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
Mumbai News : कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवरून उडी मारून तरूणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Mumbai News : कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवरून (coastal road sea link connect) उडी मारून तरूणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत तरूण मालाड (Malad) येथील रहिवासी होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात (Worli Police Station) नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दर्शित राजूभाई सेठ (30) हा मालाड येथील रहिवासी असून तो पदवीधर होता. मंगळवारी कामावरून निघाल्यावर त्याने बीकेसीवरून वांद्रे-वरळी सीलिंकमार्गे वरळीला आला. सीलिंक कोस्टल रोडला जेथे जोडला जातो. त्या कनेक्टरवर त्याने कार थांबवली.
कार उभी करून समुद्रात उडी मारली
त्यानंतर थोडावेळ उभे राहून त्याने थेट समुद्रात उडी मारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बुधवारी सागरी सेतू परिसरात त्याचा मृतदेह सापडला आहे. चार महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुलीला इमारतीच्या 29 व्या मजल्यावरून फेकून आईची आत्महत्या
दरम्यान, पळस्पे येथील एका इमारतीच्या 29 व्या मजल्यावरून पोटच्या मुलीस फेकून आईने स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना पनवेल येथे घडली. या प्रकरणी मयत मुलीच्या आईने पनवेल शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, आशिष हरिश्चंद्र दुवा याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. पतीचे अन्य स्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याने तो आपल्या मुलीला मारहाण करायचा. यातूनच तिचा छळ करून त्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मयत महिलेच्या आईने केली होती. 12 मार्च रोजी पळस्पे फाटा येथील मॅरेथॉन नेक्सन औरा इमारतीच्या 29 व्या मजल्यावरून आठ वर्षीय मुलीला तिच्या आई मैथिलीने बेडरूमच्या खिडकीतून बाहेर फेकले होते. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मैथिलीनेही उडी मारून आत्महत्या केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

