एक्स्प्लोर
CIA JFK assassination: अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
Amercia CIA: सीआयए गुप्तचर यंत्रणेचे भारतात गोपनीय तळ होते. या जागांवरुन अमेरिकेच्या गुप्त मोहीमा चालायच्या, अशी माहिती कागदपत्रांमधून समोर आली आहे.

CIA had secret bases in Kolkata
1/6

अमेरिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी हत्याप्रकरणी रशियातील एका वृत्तसंस्थेने खळबळजनक ट्विट केले आहे. जॉन एफ. केनेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी 1963 साली म्हणजे शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा सीआयए संदर्भात काही महत्त्वाची कागदपत्रं समोर आली आहेत.
2/6

यापूर्वी 2013 साली भारताच्या पीटीआय वृत्तसंस्थेने सीआयएच्या भारतातील गुप्त मोहीमांविषयी माहिती समोर आणली होती. भारताने सीआयएला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ओडिशातील चारबतिया हवाईतळ वापरण्यास परवानगी दिली होती.
3/6

केनेडी यांच्या हत्याप्रकरणासंदर्भात जी कागदपत्रं समोर आली आहेत, त्यामध्ये भारतातील सीआयएच्या गुप्त तळाचा उल्लेख आहे. भारतातील या तळांना ब्लॅक साईटस म्हणून संबोधले जाई.
4/6

सीआयएकडून या तळांचा वापर गुप्त मोहीमा आणि दहशतवाद्यांना डांबून ठेवण्यासाठी केला जात असे, अशी माहिती रशियन वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या कागदपत्रांमधून समोर आली आहे.
5/6

या कागदपत्रांमध्ये पाकिस्तानातील रावळपिंडी, श्रीलंकेतील कोलंबो, इराणमधील तेहरान, दक्षिण कोरियातील सेऊल आणि टोकियोत सीआयए संस्थेचे गुप्त तळ असल्याचीही माहिती समोर आली आहे.
6/6

यापूर्वी 2013 साली भारताच्या पीटीआय वृत्तसंस्थेने सीआयएच्या भारतातील गुप्त मोहीमांविषयी माहिती समोर आणली होती. भारताने सीआयएला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ओडिशातील चारबतिया हवाईतळ वापरण्यास परवानगी दिली होती.
Published at : 20 Mar 2025 07:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
परभणी
ठाणे
हिंगोली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion