शंभरदा नाकारलं 'त्याला', पण अखेर स्विकारावं लागलंच; 2003 मध्ये पदार्पण, 2019 मध्ये दिला हीट चित्रपट, आजही बॉलिवूड गाजवतोय 'हा' स्टार!
Bollywood Actor Life : स्ट्रगलिंग स्टार्सचे अनुभव तुम्ही अनेकदा ऐकले असतील. कुणी कधीकाळी दिग्दर्शकाला असिस्ट केलं, तर कोणी सहाय्यक अभिनेता म्हणून चित्रपटांमध्ये काम केलं.
Bollywood Actor Life : बॉलिवूड (Bollywood) म्हणजे, कलाकारांसाठी एक मायाजाल आहे, असं अनेकजण म्हणतात. तसेच, बॉलिवूड सध्या स्टार किड्स चालवतायत, असंही आपण ऐकतो. पण, असेही अनेक स्टारकिड्स आहेत, ज्यांना यशाचं सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी खरोखरं अग्नीपरीक्षा दिली आहे. सध्या बॉलिवूडचा हँडसम हंक (Handsome Hunk) म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड स्टार याचं उत्तम उदाहरण आहे. लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या अभिनेत्यानं बॅकग्राउंड डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. फिल्म इंडस्ट्रीशी कनेक्ट असूनही या स्टारकिडनं मोठ्या कष्टानं यशाचं सर्वोच्च शिखर गाठलंय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये पदार्पण करुनही आपली खरी ओळख निर्माण करायला, त्याला 16 वर्ष लागली. हा बॉलिवूडचा हॅन्डसम हंक दुसरा तिसरा कुणी नसून शाहिद कपूर (Shahid Kapoor) आहे.
इंडस्ट्रीमधील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये शाहिद कपूरचा नाव आवर्जुन घेतलं जातं. पण एक काळ असा होता की, स्टार किड असूनही शाहिद अभिनयाच्या दुनियेत आपली ओळख निर्माण करण्यासाठी जंग जंग पछाडत होता. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याला वारंवार नकारंच आले. सुरुवातीला तर या स्टार कीडनं बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं. पण, 2019 मध्ये त्याचं नशीब उजळलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 2019 मध्ये शाहिद कपूरच्या चित्रपटानं अक्षरशः बॉक्स ऑफिस हादरवलं.
स्ट्रगलिंग स्टार्सचे अनुभव तुम्ही अनेकदा ऐकले असतील. कुणी कधीकाळी दिग्दर्शकाला असिस्ट केलं, तर कोणी सहाय्यक अभिनेता म्हणून चित्रपटांमध्ये काम केलं. पण शाहिद कपूरनं बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली. ऐश्वर्याचं गाणं 'कभी आग लगे लग जावे','दिल तो पागल है' आणि 'दिल ले गई ले गई' मध्ये बॅकग्राउंड डान्स असलेल्या शाहिद कपूरला ओळखणं आपल्या सर्वांसाठी खूपच अवघड होतं.
शाहिद कपूर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर यांचा मुलगा. शाहिदनं 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून शाहिदला ओळख तर मिळाली, पण चित्रपट पाहिजे तेवढा हिट झाला नाही. 2003 मध्ये शाहिदचा 'इश्क विश्क' रिलीज झाला. यापूर्वी शाहिदनं अनेक अल्बममध्ये काम केलं होतं. 2003 मध्ये आलेल्या 'इश्क विश्क'मध्ये रोमँटिक हिरोची भूमिका साकारून त्यांनी आपली छाप पाडली.
शाहिद कपूरनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, तो पंकज कपूरचा मुलगा असल्यामुळे, म्हणजेच स्टार कीड असल्यामुळे त्याला कोणतंही काम सहजासहजी मिळालं नाही. त्याच्या आयुष्यात एक वळण असं आलं की, ज्यावेळी त्याला शंभर वेळा ऑडिशन द्यावी लागली होती. एवढ्या वेळा ऑडिशन देऊनही त्याला नाकारलं गेलं होतं. शाहिदनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एकेकाळी मला शंभरदा ऑडिशन देऊनही नाकारण्यात आलं होतं. त्यावेळी माझ्याकडे खायला किंवा ऑडिशनच्या ठिकाणी पोहोचायलाही पैसे नव्हते. मी माझ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग पाहिले, असंदेखील तो म्हणाला.
2019 मध्ये मात्र, शाहिद कपूरचं नशीब खऱ्या अर्थानं उजळलं. त्यापूर्वीही शाहिदचे अनेक चित्रपट आले, ते हिटही झाले. पण, 2019 मध्ये आलेल्या चित्रपटानं बॉक्स ऑफिस हादरवलं. शाहिदचा सुपर डुपर हिट ठरलेला चित्रपट म्हणजे, 'कबीर सिंग'.
कबीर सिंग या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर शाहिदला ते स्टारडम मिळालं, ज्याची तो वर्षानुवर्ष वाट पाहत होता. या चित्रपटानं शाहिदचं करिअर तर घडवलंच, पण निर्मात्यांनी या चित्रपटाद्वारे भरपूर नफाही कमावला. शाहिदनं आपल्या करिअरमध्ये जब वी मेट, उडता पंजाब, कबीर सिंग यासारखे चित्रपट देऊन स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यानंतर शाहिदनं ओटीटीवरही पदार्पण केलं. ओटीटीवर रिलीज झालेली त्याची पहिली वेब सीरिज फर्जी सुपर डुपर हिट ठरली.
दरम्यान, बॅकग्राउंड डान्सरपासून सुरू झालेल्या शाहिदचा प्रवास आज बॉलिवूडच्या टॉप मोस्ट अॅक्टरपर्यंत पोहोचला आहे. तब्बल शंभरदा ऑडिशन्समध्ये नाकारण्यात आलेल्या शाहिदला अखेर इंडस्ट्रीला स्विकारावं लागलंच. आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांमध्ये शाहिदच्या नावाचा आवर्जुन उल्लेख केला जातो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :