एक्स्प्लोर

Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय

Nagpur riots: नागपूरच्या मध्यवर्ती भागात हंसापुरी, महल आणि भालदारपुरा परिसरात दंगल उसळली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारासंघाची जाणीवपूर्वक निवड केल्याच आरोप

मुंबई: नागपूरच्या महल, हंसापुरी आणि भालदारपुरा या परिसरात 17 फेब्रुवारीला औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला होता. मात्र, ही दंगल (Nagpur Riots) महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये घडवण्याची योजना होती. परंतु, त्याची ठिणगी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याच मतदारसंघात पडली. हे कोणीतरी जाणीवपूर्वक घडवून आणले आहे का, याचा तपास झाला पाहिजे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न झाला. पण हे प्रकरण सरकारवरच उलटले. दंगल ही नागपूरमध्ये झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात दंगल घडवण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनाही नागपूरमध्ये आपल्या मतदारसंघात दंगल घडेल, हे अपेक्षित नसावे. हे ज्या कोणी घडवलं, त्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कमजोर दाखवायचे आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाची जाणीवपूर्वक निवड करण्यात आली. हा तपासाचा विषय आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. औरंगजेबाच्या कबरीच्या विषयावरुन राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडवण्याची योजना आखण्यात आली होती. पण ठिणगी ही देवेंद्र फडणवीस यांच्यात मतदारसंघात कशी पडली, या सगळ्यामागे कोण आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन भाजपमधील जे लोक बोलत आहेत, ते लोक बाटगे आहेत. यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुत्त्व, मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर पूर्वी चिखलफेक केली आहे. मात्र, आज हेच लोक भाजपचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत. यासारखं दुसरं हिंदुत्त्वाचं दुर्दैव नाही.  या सगळ्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रकरण त्यांच्यावरच उलटले, असे संजय राऊत यांनी म्हटले.

दिशा सालियन प्रकरण उकरुन काढण्यात कोणती शक्ती हे आम्हाला माहितीये: संजय राऊत

दिशा सालियन हिच्या वडिलांनी पाच वर्षांनी तपास पुन्हा सुरु करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्यावर दबाव होता, असे ते म्हणाले. यावर कोण विश्वास ठेवणार? या माध्यमातून ठाकरे परिवाराला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटल्यामुळे त्यामधून मुक्त होण्यासाठी दिशा सालियन प्रकरणाचा वापर केला जात आहे. यामागे कोणाची प्रेरणा आणि शक्ती आहे, याची आम्हाला माहिती आहे. अशाप्रकारचे राजकारण तुम्हालाच लखलाभ असो. एका तरुण नेत्याच्या करिअरवर तुम्ही चिखल उडवत आहात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राजकारणात कोणत्या थराला जायचे, हे महाराष्ट्रातील नेत्यांनी ठरवले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले. 

आणखी वाचा

औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका
Mohit Kamboj Coffee With Kaushik : तेजस ठाकरेंचे 'ते' व्हिडीओ, मलिकांशी वैर ते सिद्दिकी प्रकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget