Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
डान्स पाहून विद्यार्थ्यांनी मायकल जॅक्सनला प्रत्यक्ष पाहिल्याप्रमाणे टाळ्या वाजवल्या. प्राध्यापकांची जबरदस्त ऊर्जा आणि आकर्षक हालचाली पाहून महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचारी चकित झाले.

Professor Dancing Viral Video : बेंगळुरूमधील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकवणारे प्रोफेसर सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. त्यांची चर्चा कोणत्याही कठीण व्याख्यान किंवा शोधनिबंधाबद्दल नाही, तर त्यांच्या अप्रतिम हिप हॉप नृत्याबद्दल होत आहे. हा साधारण डान्स नसून प्रोफेसरने मायकल जॅक्सनप्रमाणे स्वत:ला सादर करत विद्यार्थ्यांसमोर अशा पद्धतीने डान्स केला की, विद्यार्थी बघतच राहिले. यावेळी त्यांच्या डान्सिंग अदा पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. बंगळुरूच्या एका कॉलेजमध्ये लेक्चर देणारे सर जेव्हा मायकल जॅक्सन स्टाईलमध्ये डान्स केला तेव्हा संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला. आता त्यांच्या धमाकेदार डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, असे शिक्षक प्रत्येक कॉलेजमध्ये असले पाहिजेत, असे लोक म्हणत आहेत.
View this post on Instagram
बेंगळुरूच्या प्राध्यापकाने हिप हॉप डान्स केला
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये प्रोफेसर मायकल जॅक्सनच्या आयकॉनिक स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहेत. त्यांनी केवळ हिप हॉप स्टेप्सच केल्या नाहीत तर मूनवॉक, बॉडी वेव्हज आणि फिरकी चाली देखील केल्या. डान्स पाहून विद्यार्थ्यांनी मायकल जॅक्सनला प्रत्यक्ष पाहिल्याप्रमाणे टाळ्या वाजवल्या. प्राध्यापकांची जबरदस्त ऊर्जा आणि आकर्षक हालचाली पाहून महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचारी चकित झाले.
बघणारे बघतच राहिले
हा व्हिडिओ ग्लोबल ॲकॅडमी ऑफ टेक्नॉलॉजी (GAT) च्या विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्रामवर तयार केलेल्या मीम पेजवर शेअर केला आहे. प्रोफेसर बीटबॉक्स मिक्स म्युझिकवर जोरदार डान्स करताना दिसतात. त्याच्या सर्व डान्स मूव्ह्स इतक्या अप्रतिम होत्या की तिथे उपस्थित सर्व विद्यार्थी त्यांना पाहून थक्क झाले. हा व्हिडिओ आतापर्यंत 24 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि आता अनेक लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या























