Sikandar Release Date: सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
Sikandar Release Date Announced: सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर'च्या प्रदर्शनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. स्वतः सलमान खाननं त्याच्या हँडलवरून ही माहिती शेअर केली आहे.

Sikandar Release Date Announced: बॉलिवूडचा (Bollywood) दबंग भाईजान सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित 'सिकंदर' (Sikandar Movie) चित्रपटाची आज रिलीज डेट जाहीर झाली आहे. पण, निश्चित केलेली तारीख पाहून तुम्हालाही विचार करावा लागेल की, सलमान खान काही चूक तर नाही ना करत?
खरं तर, निर्मात्यांनी नुकतीच सलमानच्या 'सिकंदर'ची रिलीज डेट जाहीर केली. अशातच चित्रपट कधी प्रदर्शित होईल, आम्ही कोणत्या चुकीबद्दल बोलत आहोत? सविस्तर जाणून घेऊयात...
कधी रिलीज होणार 'सिकंदर'?
'सिकंदर'च्या रिलीज डेटबाबत आतापर्यंत लावल्या जाणाऱ्या सर्व अटकळींना पूर्णविराम मिळाला आहे. अखेर त्याची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.
सलमान खाननंही त्याच्या इन्स्टा हँडलवरुन त्याचा तलवार धरलेला स्वतःचा फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "30 मार्च रोजी वर्ल्डवाइड थिएटरमध्ये भेटूया."
View this post on Instagram
28 मार्च ऐवजी 30 मार्चला का रिलीज होणार 'सिकंदर'?
'सिकंदर' 30 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे, तर सहसा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होतात. 30 मार्च हा रविवार आहे आणि या दिवशी तो प्रदर्शित करण्याचं कारण गुढी पाडवा आणि उगादीसारखे सण देखील याच दिवशी येतात हे देखील असू शकतं. हे दोन्ही सण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात नव्या वर्षाची सुरुवात म्हणून साजरे केले जातात.
याशिवाय, ईदच्या निमित्तानं सलमान खानचा चित्रपट चमत्कार करेल. आणि यावेळी ईदचा विचार केला तर, ईद फक्त 31 मार्च रोजीच असणार आहे. या कारणास्तव, हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे, जेणेकरून ईदच्या जवळ प्रदर्शित होऊन प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित करता येईल.
सलमान चूक तर करत नाही?
सलमान खान शुक्रवारऐवजी रविवारी चित्रपट प्रदर्शित करून चूक तर करत नाही? याचं कारण म्हणजे, सलमानचा मागील चित्रपट टायगर 3 देखील शुक्रवारऐवजी ईदला प्रदर्शित झाला होता. आता, ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित हा चित्रपटही त्याच मार्गावर आहे. पण जर आपण सलमान खानचा मागील चित्रपट टायगर 3 च्या बॉक्स ऑफिस डेटावर नजर टाकली तर, हा चित्रपट हिट असूनही, सलमान खानच्या स्टारडमशी बरोबरी करू शकला नाही. सॅनक्लिंकच्या मते, चित्रपटानं भारतात 282.79 कोटी रुपये आणि जगभरात फक्त 464 कोटी रुपये कमावले.
शानदार ओपनिंग असूनही आपटलेला 'टायगर 3'
'टायगर 3' चित्रपटानं 44.5 कोटी रुपयांची शानदार सुरुवात केली होती. परंतु तरीही चित्रपटानं यश मिळवलं नाही. याचं कारण म्हणजे, लोकांच्या सुट्ट्या शुक्रवारपासून सुरू होतात. शुक्रवारी चित्रपटाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाला सर्वाधिक प्रेक्षक मिळतात. यानंतर, शनिवार आणि रविवारी सुट्ट्यांमुळे चित्रपटाचं कलेक्शन वाढतं. अशा परिस्थितीत सलमान खानच्या चित्रपटाला शुक्रवार किंवा शनिवारचा फायदा मिळणार नाही. मागील चित्रपट टायगर 3 प्रमाणे, सिकंदरलाही दोन जास्त कमाई करणारे दिवस कमी पडतील, ज्यामुळे चित्रपटाच्या एकूण कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो.
ज्यावर्षी 'टायगर 3' प्रदर्शित झाला, त्याचवर्षी जवान आणि अॅनिमलसारखे चित्रपटही प्रदर्शित झाले होते. दिवाळीनिमित्त प्रदर्शित झालेला टायगर, 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला जवान आणि 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला अॅनिमल हा नॉन फेस्टिवल डेटला प्रदर्शित झाला होता.
जवानचा बॉक्स ऑफिसवरील परफॉर्मन्स
सॅकनिल्कच्या मते, शाहरुख खानच्या जवाननं पहिल्या दिवशी 75 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी रुपये कमावले. यानंतर, रविवारी चित्रपटाने पुन्हा 77.83 कोटी रुपये कमावले. म्हणजेच रविवार येईपर्यंत चित्रपटाने 128.23 कोटी रुपये कमावले होते. जर रविवारच्या दोन दिवस आधी ते प्रदर्शित झाले असते तर सिकंदरही हे करू शकला असता.
अॅनिमलनं शुक्रवारी 63.8 कोटी आणि शनिवारी 66.27 कोटी रुपये कमावले. रविवारी या चित्रपटाने 71.46 कोटी रुपये कमावले होते पण या वाढत्या कलेक्शनपूर्वीच चित्रपटाने 130.07 कोटी रुपये कमावले होते.
रविवारी रिलीज होणं 'सिकंदर'साठी हानिकारक ठरणार तर नाही?
सलमानच्या 'सिकंदर'ची चांगली सुरुवात होणार आहे हे खरं आहे. तसेच, 'सिकंदर'ला रविवारच्या सुट्टीचा फायदाच मिळेल असचं वाटतंय. पण जर 'सिकंदर' शुक्रवारी प्रदर्शित झाला असता, तरी रविवारी चित्रपटाचं कलेक्शन अजून वाढलं असतं. पण साजिद नाडियाडवालाच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनवलेल्या या चित्रपटाबाबत निर्मात्यांनी असा निर्णय का घेतला? आणि याचा काय फायदा होईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

