एक्स्प्लोर
PHOTO: अवतरणार... आई तुळजाभवानीचे 'महाकाली रूप'; 'आई तुळजाभवानी' मालिकेचा महाभाग
Aai Tuljabhavani Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत वेगळा कथाभाग पाहायला मिळणार आहे.

Aai Tuljabhavani Marathi Serial Track
1/8

देवींसाठी पृथ्वीवर येऊन भवानीशंकर रूपात राहिलेले महादेव, आपल्या आई-वडिलांना एकत्र आणण्यासाठी धडपडणारे बालगणेश, अशोकसुंदरी हा गोष्टीचा टप्पा अंतिम चरणात आहे.
2/8

हा टप्पा कसा उलगडणार, देवींना महादेवांचं सत्य कसं कळणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. भवानी शंकरच महादेव आहेत, हे कळल्यावर मालिका कुठलं नवं वळण घेणार आहे.
3/8

बालगणेश आणि अशोकसुंदरीनं, देवींसाठी तुळजापुरात वाड्याची निर्मिती करण्याची विनंती करण्यामागची प्रेरणा आईवडिलांना एकत्र आणावी हीच होती.
4/8

"वेगवेगळ्या प्रकारचे हार, मुकुट घालून पाहिले कारण आम्हांला कुठल्याही प्रकारची कसर सोडायची नव्हती. माझी अशी नाही पण संपूर्ण टीमची यामागे अफाट मेहेनत होती... मी पहिल्यांदाच असं रूप धारण करत होते, त्यामुळे दडपण होतंच, पण मला ऊर्जा मिळत गेली आणि मी तसं काम करत गेली. मला आशा आहे तुम्हाला देखील आवडेल.", असं अभिनेत्री पूजा काळे म्हणाली.
5/8

हा कथाभाग गुरुवार 20 फेब्रुवारी ते शनिवार 22 फेब्रुवारीच्या भागांमध्ये दररोज रात्री नऊ वाजता उलगडणार आहे, याचा कळससाध्य येत्या रविवार 23 फेब्रुवारीच्या महाएपिसोड मध्ये होणार आहे.
6/8

महादेव आणि संपूर्ण कुटुंबानं सत्य लपवल्यानं व्यथित झालेल्या देवीच्या रागात महिषासुरानं केलेल्या आगळीकीनं भर पडणार आहे आणि आई तुळजाभवानीचं आजवर कधीही न पाहिलेलं न भूतो न भविष्यति महाकाली रूप प्रेक्षकांना दिसणार आहे.
7/8

आई तुळजाभवानीच्या 'महाकाली रूप'बाबत बोलताना अभिनेत्री पूजा काळे म्हणाली की, "मालिकेमध्ये एक नवं वळण येणार आहे, प्रेक्षकांना आई तुळजाभवानीचं महाकाली रूप पाहायला मिळणार आहे. हे रूप हुबेहूब साकारण्यासाठी म्हणजेच मेकअप, आभूषणं, पेहराव हे सगळं मिळून मला 3-4 तासांचा कालावधी लागला."
8/8

दरम्यान, महिषा सुराची ही आगळिक कोणती? देवीला व्यथित करणारे भवानीशंकरांचे सत्य कोणते? आणि आई तुळजाभवानीचे महाकाली रुपाचे प्रयोजन काय? हे आई तुळजाभवानी मालिकेच्या महारविवारच्या भागात उलगडणार आहे.
Published at : 21 Feb 2025 07:46 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
शेत-शिवार
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
