Hiray Family : निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
Maharashtra Assembly Elections 2024 : हिरे घराण्यातील अद्वय हिरे मालेगाव बाह्य मतदारसंघातून तर नाशिक पश्चिममधून सीमा हिरे या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आमदारकीसाठी आजमावत आहे.
नाशिक : मालेगाव (Malegaon) तालुक्यातील दहा हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या निमगाव गावाने आतापर्यंत वेगवेगळ्या मतदारसंघात एकट्या हिरे घराण्याने (Hiray Family) आठ आमदार दिले आहेत. निमगाव या गावाला राजकीयदृष्ट्या आजही तितकेच महत्त्व असून राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून निमगाव (Nimgaon) या गावाकडे बघितले जाते.
निमगाव हे मालेगाव तालुक्याच्या कक्षेत येत असले, तरी त्याचा अंतर्भाव हा नांदगाव मतदारसंघात होतो. इथल्या 'हिरे ' घराण्याचा लौने राजकारणाशिवाय समाजकारण, शिक्षण, उद्योग ही क्षेत्रेही चांगल्यापैकी गाजवली. किक अवघ्या राज्यभर आहे. या घराण्यातील तब्बल पाच जणांनी मंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. या पाच जणांपैकी स्व. भाऊसाहेब हिरे यांचे नाव तर एकेकाळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आले होते. भाऊसाहेब हिरे यांच्यासमवेत व्यंकटराव हिरे, बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे आणि प्रशांत हिरे यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात यापूर्वी स्थान पटकावले आहे.
हिरे घराण्याचा इतिहास
नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्राच्या राजकीय कॅन्व्हासवर चमकवण्याचे काम डॉ.भाऊसाहेब हिरे यांच्यामुळे झाले. पारतंत्र्याच्या काळापासून हिरे घराण्याकडे सत्तेची सूत्रे राहिली. मालेगावमधील लोकल सेल्फ गव्हर्नमेंटपासून तर राज्याच्या महसूलमंत्र्यापर्यंत डॉ.भाऊसाहेब हिरे यांनी नानाविध पदे भूषवली. नाशिक जिल्हा बँकेच्या स्थापनेसाठीही हिरे यांनीच सहभाग घेतला. भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर व्यंकटराव हिरे 1967 ते 1972 मध्ये राज्यमंत्री राहिले.त्यानंतर व्यंकटराव हिरे यांनी चुलतभाऊ डॉ.बळीराम हिरे यांना राजकारणात उतरवले. त्यानंतर बळीराम हिरे यांनीही आरोग्यमंत्रीपद भूषवले. पुढे पुष्पाताई हिरे एस. काँग्रेस उमेदवार झाल्या व त्यांनीही आमदारकी व परिवहन राज्यमंत्रीपद भूषविले. पुष्पाताईंचे सुपुत्र प्रशांत हिरे यांनी देखील आमदारकी व राज्यमंत्रीपद भूषवले आहे. अपूर्व हिरे हे विधान परिषदेवर आमदार झाले तर सीमा हिरे या नाशिक पश्चिम या मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत.
हिरे घराण्याचा राज्यभर लौकिक
एकूणच, निमगाव व हिरे घराण्याशी संबधित भाऊसाहेब हिरे, शिवराम हिरे, व्यंकटराव हिरे, बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे, अपूर्व हिरे, सीमा हिरे ही निमगाव येथील आमदारकी व मंत्रीपदे भूषवलेली हिरे घराण्यातील नावे आहेत.त्यामुळे हिरे घराण्याचा लौकिक राज्यभर पोहोचला आहे. आजही हिरे घराण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे मालेगाव बाह्य मतदारसंघातून तर नाशिक पश्चिममधून सीमा हिरे या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आमदारकीसाठी आजमावत आहे.
आणखी वाचा