Team India : बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
Team India : भारतीय पुरुष क्रिकेट संघाने या महिन्याच्या सुरुवातीला (9 मार्च) अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. अंतिम फेरीत भारताने किवीजवर 4 विकेट्सने विजय मिळवला.

Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या विजेत्या टीम इंडियावर बक्षीसांचा वर्षाव केला आहे. मंडळाने 58 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. हा पुरस्कार खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ आणि अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला देण्यात येणार आहे. कोणाला किती पुरस्कार मिळणार हे मंडळाने आपल्या निवेदनात सांगितले नाही. भारतीय पुरुष क्रिकेट संघाने या महिन्याच्या सुरुवातीला (9 मार्च) अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. कर्णधार रोहित शर्माच्या कुशल आणि चतुर नेतृत्वाखाली, भारताने स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम राखले आणि स्पर्धेत अपराजित राहून जेतेपदावर कब्जा केला. रोहित ब्रिगेडने आपला वेग कायम ठेवत न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव केला. अंतिम फेरीत भारताने किवीजवर 4 विकेट्सने विजय मिळवला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मेन इन ब्लूने इतिहास रचला
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, 'सलग ICC खिताब जिंकणे विशेष आहे आणि हा पुरस्कार जागतिक स्तरावर टीम इंडियाचे समर्पण आणि उत्कृष्टता दर्शवतो. ICC अंडर-19 महिला विश्वचषक जिंकल्यानंतर 2025 मधील ही आमची दुसरी ICC ट्रॉफी देखील आहे, जी आपल्या देशात सध्याच्या मजबूत क्रिकेट प्रणालीवर प्रकाश टाकते. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा चार विकेट्स राखून पराभव केला. अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी 252 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी एक षटक बाकी असताना पूर्ण केले. भारतीय संघाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. 2002 च्या मोसमात भारतीय संघ पहिल्यांदा चॅम्पियन बनला होता. त्यानंतर त्याने श्रीलंकेसोबत संयुक्तपणे जेतेपदाची कमाई केली. त्यानंतर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2013 साली चॅम्पियन बनला. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मेन इन ब्लूने इतिहास रचला.
भारत-न्यूझीलंडवर पैशांचा पाऊस
यापूर्वी 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकूनही भारतीय संघावर पैशांचा वर्षाव झाला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाला अंदाजे 19.48 कोटी रुपये ($2.24 दशलक्ष) मिळाले. तर अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला म्हणजेच न्यूझीलंडला अंदाजे 9.74 कोटी रुपये ($1.12 दशलक्ष) मिळाले. आयसीसीने बक्षिसाची रक्कम आधीच जाहीर केली होती. विशेष बाब म्हणजे उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांनाही तेवढीच रक्कम 4.87 कोटी रुपये देण्यात आली. म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघही श्रीमंत झाले. गटातून बाहेर पडलेल्या संघांना बक्षिसाची रक्कमही मिळाली. पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघांना (अफगाणिस्तान आणि बांगलादेश) समान रक्कम $3,50,000 (अंदाजे 3.04 कोटी रुपये) मिळाली. तर सातव्या आणि आठव्या स्थानावरील संघांना (पाकिस्तान आणि इंग्लंड) समान रक्कम $1,40,000 (सुमारे 1.22 कोटी रुपये) मिळाली.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. ग्रुप स्टेजमधील सामना जिंकण्यासाठी संघाला 34000 डॉलर (सुमारे 29.61 लाख रुपये) मिळाले. याशिवाय आठही संघांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी $1,25,000 (अंदाजे रु. 1.08 कोटी) ची हमी रक्कम देण्यात आली आहे. आयसीसीने या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण $6.9 दशलक्ष (सुमारे 60 कोटी रुपये) बक्षीस रक्कम वितरित केली. हे 2017 च्या तुलनेत 53 टक्के अधिक आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी बक्षीस रक्कम: (USD डॉलर)
- विजेता संघ (भारत): $2.24 दशलक्ष (रु. 19.48 कोटी)
- उपविजेता (न्यूझीलंड): $1.24 दशलक्ष (रु. 9.74 कोटी)
- सेमीफायनल (ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका): $5,60,000 (रु. 4.87 कोटी)
- पाचवा-सहावा संघ (अफगाणिस्तान आणि बांगलादेश): $3,50,000 (रु. 3.04 कोटी)
- सातवा-आठवा संघ (पाकिस्तान आणि इंग्लंड): $1,40,000 (रु. 1.22 कोटी)
- ग्रुप स्टेज विजय: $34,000 (रु. 29.61 लाख)
- हमी पैसे: $1,25,000 (रु. 1.08 कोटी)
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

