दि सह्याद्री सहकारी बँकेतील घोटाळ्याबाबत श्रीकांत भारतीय यांची लक्षवेधी, 2 महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे सहकार मंत्र्यांचे सुतोवाच
The Sahyadri Sahakari Bank Scams : माथाडी कामगारांसाठी प्रसिद्ध असलेल्या दि सह्याद्री सहकारी बँकेतील (The Sahyadri Sahakari Bank) घोटाळ्याचे आता विधान परिषदेत ही पडसाद उमटल्याचे बघायला मिळाले आहे.

मुंबई : माथाडी कामगारांसाठी प्रसिद्ध असलेल्या दि सह्याद्री सहकारी बँकेतील (The Sahyadri Sahakari Bank) घोटाळ्याचे आता विधान परिषदेत ही पडसाद उमटल्याचे बघायला मिळाले आहे. भाजप नेते आणि आमदार श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya) यांनी सभागृहात लक्षवेधी उपस्थीत करत सहकार मंत्र्यांकडून लक्षवेधीला उत्तर देताना बँकेत घोटाळा झाला असल्याच निदर्शनास आलंय. दरम्यान येत्या 2 महिन्यात चौकशी पूर्ण करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे सुतोवाच ही सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी केलं आहे.
भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी शुक्रवारी (21 मार्च) सभागृहात सह्याद्री बँकेचे सध्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम माने यांनी कशाप्रकारे भ्रष्टाचार केला आहे, याचा पाढा वाचला. तसेच त्यांना तत्काळ पदावरून बाजूला करण्याची मागणी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली. यावेळी बाबासाहेब पाटील यांच्याकडून बँकेचे अध्यक्ष पुरुषोत्तम माने यांच्या विरुद्ध शासनाकडे तक्रार प्राप्त झाली असून याप्रकरणी सरकारने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल आल्याच सभागृहाला अवगत केलं.
श्रीकांत भारतीयांकडून सभागृहात बँकेतील भ्रष्टाचाराचा पाढा
सादर केलेल्या या अहवालात बँकेने मोठ्या प्रमाणात लॉकर्स खरेदी करणे, सातारा शाखेमधे जास्तीचे फर्निचर खरेदी करणे, न्यायालयीन प्रकरणांमध्ये झालेला वारे माप खर्च करणे, रोखे खरेदी विक्री व्यवहारांमध्ये तोटा होणे, वाहन खरेदी नोकरभरती यात मोठ्या प्रमाणावर खर्च करणे, अधिकृत विक्रेत्यांकडून टेंडर न मागवता एजंटकरवी गोदरेजच्या लॉकरची बेकायदेशीर मोठ्या रकमेने खरेदी करणे, असे प्रकार निदर्शनास आल्याची माहिती सभागृहाला दिली. तसेच याप्रकरणी बँकेचा खुलासा समाधानकारक न आल्यामुळे तत्काळ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83(1) अन्वये चौकशीचे आदेश दिले असून पुढील 2 महिन्यात चौकशी पूर्ण करून फौजदारी कारवाई करण्याचे सुतोवाच केलं आहे.
समिती स्थापन केली असताना आणखी 2 महिने कशासाठी?
या संपूर्ण प्रकरणी आमदार श्रीकांत भारतीय यांनी संबंधीत अध्यक्षांच्या कारभारा बाबत चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून आता आणखी 2 महिने कशासाठी असा सवाल उपस्थित करण्यात आला. सध्या या बँकेच्या निवडणुका लागल्या असून तत्काळ सध्याचे अध्यक्ष यांना निवडणुकीपासून रोखावं अशी मागणी केली परंतु यावर सहकार मंत्र्याकडून २ महिन्यात चौकशी पूर्ण करू तसेच अहवाल प्राप्त झाल्यानंतर तोपर्यंत जर बँकेच्या निवडणूका उरकल्या असल्या तरी संबंधितावर कारवाई होईल असं आश्वासन सभागृहाला दिलं.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

