एक्स्प्लोर
पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात, पाहा फोटो
Satara News :सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यातील एका कार्यालयाला आग लागली आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात आग
1/6

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यातीलएका इमारतीला आग लागली. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्त्वात या साखर कारखान्याचं कामकाज चालतं.
2/6

पाटण तालुक्यातील दौलतनगर- मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली.
3/6

ही आग जवळपास अडीच ते तीन तास सुरु होती. आग विझवण्यासाठी मरळी सहकारी साखर कारखाना, कृष्णा हॉस्पिटल, जयवंत शुगर यासह कराड नगरपालिकेचीही अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल झाली होती.
4/6

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेवेळी उभारलेल्या शेती ऑफिसला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
5/6

दरम्यान, अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. आग पाहण्यासाठी रात्री लोकांनी मोठी गर्दी केली होती
6/6

कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात काही दिवसांपूर्वी बॉयलरच्या टेस्टिंगवेळी स्फोट झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर काहीच दिवसात आता पाटणच्या साखर कारखान्यातील आगीची घटना समोर आली आहे.
Published at : 23 Mar 2025 11:22 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion