एक्स्प्लोर

Balasaheb Thorat on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं

Balasaheb Thorat on Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची मागणी तिच्या आई-वडिलांनी केलीय. यावरून बाळासाहेब थोरातांनी मोठं वक्तव्य केलंय.

Balasaheb Thorat on Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची (Disha Salian Death Case) नव्यानं चौकशी करण्याची मागणी तिच्या आई-वडिलांनी केलीय. दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक चौकशी करा अशी मागणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे केली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप करतानाच या प्रकरणात आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सूरज पांचोली, एकता कपूर, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती, इम्तियाज खत्री, शोविक चक्रवर्ती, आदित्यचे सुरक्षा रक्षक हिमांशू शिक्रे या सर्वांचे 3 ते 20 ऑगस्ट 2020 चे कॉल रेकॉर्ड चेक करा, टॉवर लोकेशनही तपासून घ्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आता यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

नेमकं काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

संगमनेर तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 58 वा गळीत हंगामाची सांगता आज करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की,  2014 पासून देशात आरोपांचं, दबावाचं राजकारण सुरू आहे. या सगळ्या गोष्टीमागे राजकारण असण्याची शक्यता आहे. हा दबावतंत्राचा एक भाग असू शकतो, हे मला माझ्या अनुभवावरून वाटते, असे त्यांनी म्हटले. 

हे सरकारच अपयशी

नागपूरात औरंगजेबच्या कबरी प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सोमवारी सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने या जमावाला आवरताना पोलीस आणि नागरिक ही जखमी झाले आहेत. याबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, एकीकडे प्रत्येक देश विकासासाठी धडपड करतोय. आम्ही मात्र इतिहासात जाऊन जुन्या कबरी उचकत आहोत. जातीभेद, धर्मभेद आपल्याला मागे घेऊन जात आहेत. हे पूर्ण सरकारच अपयशी आहे. परभणी, बीड व आता नागपूरमध्ये देखील अशा घटना घडत आहे, अशी टीका त्यांनी यावेळी राज्य सरकारवर केली आहे.  

बाळासाहेब थोरातांची पत्नीच्या जन्मदिनी मिश्कील टिप्पणी

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात यांचा वाढदिवस असल्याने सांगता सभेच्या मंचावरच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी मिश्किल टिपण्णी केल्याने सभेत मोठा हास्यकल्लोळ झाला. आज प्रथमच कांचनचा वाढदिवस मोठा साजरा झाला. कांचन नशीबवान आहे. मात्र मी तिच्या पेक्षा जास्त नशीबवान आहे. तुमची परिस्थिती मला माहित नाही. मात्र, मला कधीही त्रास नाही. घरातलं सगळं ती सांभाळते, कितीही काहीही असो पण घरात चुकून कटकट नाही. याला देखील नशीब लागतं. तुम्ही टाळ्या वाजवता याचा अर्थ मला कळतोय. तुमचंही चांगलंच असेल, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी यावेळी केली.

आणखी वाचा 

Disha Salian & Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंवर आरोप होताच करुणा शर्मा मैदानात; 'त्या' संवेदनशील प्रकरणाचा उल्लेख करत म्हणाल्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balasaheb Thorat on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
Meerut Case : हॅलो साहिल, सौरभ झोपलाय लवकर घरी ये; दोघांनी हात, शीर धडावेगळं केलं अन् बायको बाॅयफ्रेंडच्या घरी घेऊन गेली
हॅलो साहिल, सौरभ झोपलाय लवकर घरी ये; दोघांनी हात, शीर धडावेगळं केलं अन् बायको बाॅयफ्रेंडच्या घरी घेऊन गेली
Disha Salian & Aaditya Thackeray: ...तर उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे देश सोडून... रामदास कदमांचं मोठं वक्तव्य
शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणे गंभीर गोष्ट, लाज असती तर उद्धव-आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत देश सोडला असता: रामदास कदम
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh Angry Speech : ओ परब! तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघांचा रुद्रावतारABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 20 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सSanjay Gaikwad on Disha Salian case | पुरावे नसल्यानेच आदित्य ठाकरेंना क्लीनचीट देण्यात आली- गायकवाडNaresh Mhaske on Disha Salian : बनाव आहे म्हणणाऱ्यांनी तारखा आणि कॉल डिटेल्स तपासावेत- नरेश म्हस्के

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balasaheb Thorat on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
Meerut Case : हॅलो साहिल, सौरभ झोपलाय लवकर घरी ये; दोघांनी हात, शीर धडावेगळं केलं अन् बायको बाॅयफ्रेंडच्या घरी घेऊन गेली
हॅलो साहिल, सौरभ झोपलाय लवकर घरी ये; दोघांनी हात, शीर धडावेगळं केलं अन् बायको बाॅयफ्रेंडच्या घरी घेऊन गेली
Disha Salian & Aaditya Thackeray: ...तर उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे देश सोडून... रामदास कदमांचं मोठं वक्तव्य
शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणे गंभीर गोष्ट, लाज असती तर उद्धव-आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत देश सोडला असता: रामदास कदम
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Chhattisgarh Naxal Encounter : बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
Disha Salian Case : तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
Anil Parab : किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती, जयकुमार गोरेंचे उघडे, नाXडे फोटो सभागृहात आले; अनिल परबांचा हल्लाबोल
किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती, जयकुमार गोरेंचे उघडे, नाXडे फोटो सभागृहात आले; अनिल परबांचा हल्लाबोल
मोठी बातमी : राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू, शिक्षणमंत्र्यांची सभागृहात घोषणा
मोठी बातमी : राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू, शिक्षणमंत्र्यांची सभागृहात घोषणा
Embed widget