एक्स्प्लोर
Honey Singh Net Worth : 15 कोटींचं घर, महागड्या गाड्यांचं कलेक्शन, लॅविश लाईफ जगणाऱ्या हनी सिंगच्या संपत्तीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील
Honey Singh Net Worth :अभिनेता नसून देखील इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत गायकांपैकी एक असलेल्या हनी सिंगच्या लॅविश लाईफबद्दल जाणून घेऊयात..

Photo Credit - abp majha reporter
1/10

पंजाबी गायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या हनी सिंगने फक्त पंजाबी इंडस्ट्रीलाच नाही तर बॉलिवूडलाही अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.
2/10

रॅप आणि गाण्याची त्याची खास शैली चाहत्यांना खूप आवडते. मात्र, एक वेळ अशी आली जेव्हा हनी सिंगच्या स्टारडमची जगभरात चर्चा झाली होती. दरम्यान, त्यालाही अंमली पदार्थांचे व्यसन जडले आणि त्यानंतर अनेक वर्षे तो अज्ञातवासात राहिला.
3/10

मात्र, आता हनी सिंगने पुन्हा एकदा धमाकेदार पुनरागमन केले आहे. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याची एकूण संपत्ती किती आहे?
4/10

हनी सिंगने अगदी लहान वयातच गाणे गायला सुरू केले होते हे सर्वश्रूत आहे. आज तो केवळ लोकप्रिय गायकच नाही तर निर्माता आणि संगीतकारही आहे.
5/10

पंजाबीशिवाय हनी सिंगने आतापर्यंत हिंदी आणि अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आज त्याचे नाव देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांच्या यादीत सामील झाले आहे.
6/10

मीडिया रिपोर्टनुसार, हनी सिंगची संपत्ती 200 कोटींहून अधिक आहे. एका गाण्यासाठी हनी सिंग लाखो रुपये फी घेतो.
7/10

हनी सिंगच्या फीबद्दल बोलायचे झाले तर एका गाण्यासाठी तो जवळपास 70 लाख रुपये घेतो. एका महिन्यात सिंगरची कमाई 1 कोटी रुपये आहे आणि वर्षाची कमाई विचारात घेतली तर 12 कोटींहून अधिक आहे.
8/10

एवढेच नाही तर पंजाब व्यतिरिक्त दिल्ली एनसीआरला लागून असलेल्या गुडगावच्या पॉश भागात हनी सिंगचे एक आलिशान घर आहे. यातील एका घराची किंमत सुमारे 3 कोटी रुपये तर दुसऱ्या घराची किंमत 15 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
9/10

हनी सिंगला महागड्या गाड्यांचाही खूप शौक आहे. त्याच्याकडे ऑडी ते जग्वार पर्यंतच्या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय त्याच्याकडे हार्ले डेव्हिड सन सारखी महागडी बाईक देखील आहे.
10/10

त्याच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, हनी सिंगने 2011 मध्ये शालिनीसोबत लग्न केले. पण 2022 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर त्याने अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे.
Published at : 15 Mar 2025 06:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
