Pune Accident : पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात, 2 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी
पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात (Pune Accident) झाले आहेत. एकाच रात्री झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात 2 जणांचे मृत्यू तर 3 जण जखमी झाले आहेत.

Pune Accident News : पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात (Pune Accident) झाले आहेत. एकाच रात्री झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात 2 जणांचे मृत्यू तर 3 जण जखमी झाले आहेत. पुण्यातील काळेपडळ पोलीस स्टेशन आणि फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे तिनही अपघात घडले आहेत. यामुळं पुन्हा एकदा पुण्यातील अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
नेमके कोणत्या भागात झाले अपघात?
पहिल्या अपघातात 34 वर्षीय डिलिव्हरी बॉयचा तर दुसऱ्या एका अपघातात 85 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात पुणे सासवड रोडवर उरळी देवाची या परिसरात घडला असून, या अपघातात सिंधुबाई क्षीरसागर या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चारचाकी वाहन पाठीमागे घेत असताना वाहनाची महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील चालक मनोज अहिरेला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसऱ्या अपघातात काळेपडळ परिसरातील फूड डिल्व्हरी बॉयला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला आहे. मझहर जिलानी शेख असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध पुण्यातील काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून अज्ञात वाहन चालकाचा तपास सुरु आहे. तर तिसरा अपघात हा हडपसर परिसरात झाला. जेएसपीएम कॉलेजच्या समोर एक भीषण अपघात झाला असून, या अपघातात देखील एक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

