एक्स्प्लोर

Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल

Manikrao Kokate : ही वाईट लोकांची वाईट खेळी आहे. घाई गर्दीत कोकाटे यांचा निकाल दिला आहे. इतर लोकांना बाजू मांडू दिली नाही. कोकाटे निर्लज्ज मनुष्य असल्याची टीका वकिलांनी केली आहे.

Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याच्या संदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यावरील अपात्रतेची होणारी कारवाई टळली आहे. मात्र, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देताना जे निरीक्षण नोंदवलेले ते निरीक्षण आता चर्चेत आले आहे. माणिकराव कोकाटे यांना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल, असे निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. आता यावरून कोकाटे यांच्या विरोधात हस्तक्षेप याचिका करणारे वकील तथा माजी न्यायाधीश सतीश वाणी (Satish Wani) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 

सतीश वाणी म्हणाले की, ही वाईट लोकांची वाईट खेळी आहे. घाई गर्दीत कोकाटे यांचा निकाल दिला आहे. इतर लोकांना बाजू मांडू दिली नाही. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. एकीकडे खोटं सांगून सदनिका घेतात. दुसरीकडे ३० लाख वाटायला लागतात, त्यासाठी बंदुकीचे लायसन्स मागितले. कोकाटे निर्लज्ज मनुष्य आहे, असे त्यांनी म्हटले. 

राज्यपालांकडे पत्रव्यवहार करणार 

तडीपार राहिलेला मनुष्य आपल्या देशाचा गृहमंत्री आहे. आपल्या नाशिकचा पालकमंत्री गृहमंत्री ठरवतात हे दुर्दैव आहे. सिंचनात पाणी येत नाही तर मी काय करू असे एक जण बोलले. माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात अंजली राठोडने याचिका दाखल केली. झुंझार आव्हाड हे देखील याचिका करत आहेत. कोकाटे यांना शिक्षा दिली आहे तर त्याला स्थगिती कशी दिली? दंड तर भरलेला आहेच ना? कारवाई व्हायला पाहिजे होती. लिली थॉमसन यांच्या प्रमाणे राज्यपाल कारवाई करणार की नाही? मी स्वतः राज्यपाल यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे सतीश वाणी यांनी म्हटलंय. 

न्यायालयाने दिलेल्या निकालाशी आम्ही सहमत नाही

कोकाटे यांचे गोव्याला हॉटेल आहे. ते 30 लाख रुपये महिन्याला वाटतात. मला न्यायाधीश यांच्यावर कॉमेंट करायची नाही. आम्ही निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलोय, चुकीचा निर्णय दिला आहे. 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल, त्यांना आमदारकीला उभं करू नये, असे फाळके मॅडमने म्हंटले आहे. ज्यांनी निकाल दिला अशा न्यायाधीशाने समाजकार्य करावे. कशाला पगार घेऊन काम करतात? बबन घोलप हे 16 वर्षांपासून बाहेर आहेत. मुंडे यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. जीवने न्यायाधीश यांच्यावर rss चा दबाव आला का? ते पण नागपूरचे आहेत ना. न्यायाधीश यांनी निकाल आधीच टाईप करून आणला होता. बाकीचे निकाल ६ महिन्यांनी लावतात. आम्हाला नकला सुद्धा द्यायला ते तयार नव्हते. न्यायालयाने दिलेल्या निकालाशी आम्ही सहमत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Manikrao Kokate : मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02PM TOP Headlines 02 PM 15 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01PM TOP Headlines 12 PM 15 March 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Manikrao Kokate : मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
...तर राज्य अन् केंद्र सरकारला यात लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू; शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरून शरद पवरांकडून चिंता व्यक्त      
...तर शेतकऱ्यांच्या मुद्यावर राज्य अन् केंद्र सरकारला लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू; शरद पवरांकडून चिंता व्यक्त      
'योग अन् यज्ञ' हेच सनातन संस्कृतीचे प्राण तत्व; पतंजली विश्वविद्यालयात बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत होलिकोत्सव साजरा
'योग अन् यज्ञ' हेच सनातन संस्कृतीचे प्राण तत्व; पतंजली विश्वविद्यालयात बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत होलिकोत्सव साजरा
Embed widget