एक्स्प्लोर

खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा कोल्हापूर न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

मुंबई : इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन करुन धमकी दिल्यानंतर आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याबद्दल प्रशांत कोरटकरविरुद्ध पोलीस तक्रार दाखल झाला आहेत. याप्रकरण, कोल्हापूर न्यायालयात सुनावणी सुरू असून अद्यापही पोलिसांनी प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) ना अटक केलीय, ना त्याची कार जप्त केलीय. त्यामुळे, पोलिसांकडून कारवाईमध्ये दुजाभाव केला जात असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे बीडमधील सतिश भोसले उर्फ खोक्याला अटक करताच, पोलिसांनी त्याची कार जप्त केली. तसेच, त्याच्या घरावरही बुलडोझर फिरवण्यात आल्याने पोलिसांच्या कारवाईचं स्वागत केलं जात आहे. मात्र, प्रशांत कोरटकरवर तशी कारवाई का होत नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. आता, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी थेट प्रश्न विचारला आहे. का, प्रशांत कोरटकर ब्राह्मण आहे म्हणून कारवाई होत नाही का? असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.   

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा कोल्हापूर न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. प्रशांत कोरटकरने दिलेल्या धमकी प्रकरणी कोल्हापूर न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिलासा देत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी केलेली विनंती कोर्टाने फेटाळलीये. आता, याप्रकरणी 17 मार्चपासून दररोज सुनावणी होणार आहे. मात्र, पोलिसांकडून कोरटकरवर कारवाईसाठी तितकी तत्परता दिसून येत नाही. त्यावरुन, अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 

छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची रायल रॉईज कार का जप्त केली नाही, खोक्याची एक गाडी लगेच जप्त केली, असे म्हणत प्रशांत कोरटकरवर कारवाई का होत नाही, असा सवाल ऑल इंडिया पँथर सेनेचे दीपक केदार यांनी विचारला होता. त्यानंतर, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील हाच प्रश्न उपस्थित केला आहे. बीडच्या लढ्यामुळे एक महत्वाचा विषय माझ्याकडून राहिला. तो म्हणजे प्रशांत कोरटकरांचा. मी दीपक केदार यांना ओळखत नाही, पण त्यांचे जे  विधान त्यांनी माध्यमांपुढे केले ते योग्य आहे, असे म्हणत अंजली दमानिया यांनी केदार यांचे समर्थन करत प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न सरकारला विचारला आहे.  

ते ब्राह्मण आहेत म्हणून का?

जर सतीश भोसलेवर कारवाई होते, त्याची गाडी जप्त होते. मग प्रशांत कोरटकर ज्यांनी इंद्रजित सावंत यांना धमकी दिली, त्यांना फरार होऊ दिले जाते, त्यांची Rolls Royce कार जप्त होत नाही. जप्त तर सोडा, ती कुठून आली त्याची चौकशी देखील का होत नाही, ते ब्राह्मण आहेत म्हणून?, असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे. तसेच, हा जातीवाद बंद झाला पाहिजे, सेलेक्टिव अॅक्शन घेणे साफ चुकीचे आहे, आणि हे बंद झाले पाहिजे, असेही दमानिया यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

हेही वाचा

बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU

व्हिडीओ

Ravindra Chavan on KDMC : KDMC मध्ये सत्तेसाठी मनसे शिंदेंसोबत; रविंद्र चव्हाण म्हणाले...
Special Report Mumbra Sahar Shaikh : 'कैसा हराया..', विजयाचा गुलाल, मुंब्रा करणार हिरवा?
Tuljapur Temple Donation Issue : भक्ताची अंगठी, अडवणुकीची घंटी; मंदिर प्रशासनाचा अजब ठराव
Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report
Beed Girl Letter Ajit Pawar : शिकायचं की ऊसोड करायची? चिमुकलीने पत्रातून मांडली व्यथा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
Embed widget