Rajan Patil : राजन पाटील थेट काँग्रेसच्या स्टेजवर, दिलीप मानेंचा वादळी नेतृत्व म्हणून उल्लेख, येणाऱ्या 2-3 महिन्यांत मानेंना आशीर्वाद देण्याचं आवाहन
Rajan Patil , Solapur : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राजन पाटील (Rajan Patil) आज थेट काँग्रेसच्या स्टेजवर गेलेले पाहायला मिळाले.
Rajan Patil , Solapur : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राजन पाटील (Rajan Patil) आज थेट काँग्रेसच्या स्टेजवर गेलेले पाहायला मिळाले. काँग्रेस नेते आणि माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राजन पाटील यांनी हजेरी लावल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. शिवाय राजन पाटील काँग्रेसच्या स्टेजवर जाऊनच थांबले नाहीत, तर त्यांनी दिलीप माने यांना येणाऱ्या 2-3 महिन्यात आशीर्वाद देण्याचं आवाहन देखील केलं आहे. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने देखील उपस्थित होते.
राजन पाटील काय काय म्हणाले?
राजन पाटील म्हणाले, आज आपण दिलीप मानेंचं अभिष्टचिंतन करण्यासाठी आलो आहोत. मी आज फारसं काही बोलणार नाही. परंतु माने साहेबांची दुसरी पिढी आहे. आता तिसरी पिढी या भागात समाजकारण करत आहे. दिलीप मालक राजकारणात आल्यापासून माजी आणि त्यांची मैत्री आहे. आम्ही दोघांनी विधानसभेत, जिल्हा बँकेत किंवा सहकारामध्ये काम केलं आहे. माने दादांबरोबरही मला काम करण्याची संधी मिळाली. माने दादांच्या वारसा पुढे नेण्याचं कणखर काम दिलीप मालक करत आहेत, असंही राजन पाटील यांनी सांगितलं.
येणाऱ्या 2-3 महिन्यांत मानेंना आशीर्वाद द्या
पुढे बोलताना राजन पाटील म्हणाले, माने दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत ज्यावेळी त्यांना हॉस्पिटलला ऑपरेशनला न्यायचं होतं. त्याच्यापूर्वीही त्यांनी रिक्षावाल्यांच्या संपासाठी आंदोलन केलं होतं. तशा प्रकारे समाजासाठी काम करायचं. सत्ता असो किंवा नसो. विरोधक सत्तेत असो किंवा आपण या मंडळींनी लोकांची कामं करताना तडजोड केली नाही. त्याच कुटुंबातील दिलीप मालक आज जिद्दीने काम करत आहेत. दिलीप मानेंनी आत्तापर्यंत मला कधी त्यांचं वय सांगितलं नाही. आज मी पाहिलं ते 62 वर्षांचे आहेत. त्यांना वाढदिवसाला विचारलं की म्हणायचे तुम्ही माझं वय ओळखा. परंतु 62 वय असताना सुद्धा 26 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असं काम ते करतात. मी सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करेन की, त्यांना उदंड आयुष्य लाभो. शिंदे साहेब तुम्ही इथे आहात, जनता इथे आहे. येणाऱ्या 2-3 महिन्यांत मानेंना आशीर्वाद द्या, असं आवाहनही राजन पाटील यांनी केलं.
Rajan Patil, Solapur : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार काँग्रेसच्या व्यासपीठावर!
इतर महत्वाच्या बातम्या