एक्स्प्लोर

खापराच्या घरातून आयपीएलच्या दुनियेत, तीन कोटी 60 लाखांच्या बोलीत गुजरातने घेतलं, पण अपघातात सगळंच हिरावलं, तोच हिरा आता मुंबईच्या ताफ्यात

Gumla tribal player robin minz success story : खापरीच्या घरातून आयपीएलच्या दुनियेत, तीन कोटी 60 लाखांच्या बोलीत गुजरातने घेतलं, पण अपघातात सगळंच हिरावलं, तोच हिरा आता मुंबईच्या ताफ्यात

Gumla tribal player robin minz success story : आर्थिक परिस्थिती नसताना क्रिकेटमध्ये करियर करण्याचा विचार करणे म्हणजे सोपं राहिलेलं नाही. तरी देखील आजवर अनेक जण घरच्या बिकट परिस्थितीशी झुंज देत क्रिकेटच्या जगात नाव कमावताना दिसले आहेत. आयपीएलमधील एखाद्या संघात आपले स्थान पक्के करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. स्वत:चं घर खापराचं असताना घरची परिस्थिती बिकट असताना आणि जेवण बनवण्यासाठी आणलेली लाकडं घेऊन  क्रिकेटचा सराव करणारा खेळाडू आता आयपीएलच्या जगात पोहोचलाय. आयपीएलच्या 18 व्या हंगामात तो आता मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. 

झारखंडच्या गुमला जिल्ह्याने भारतीय क्रीडा क्षेत्राला अनेक चांगले खेळाडू दिले आहेत. फुटबॉल, हॉकी ते एथलेटिक्समध्ये येथील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकताना दिसले आहेत. मात्र, या जिल्ह्यातून क्रिकेटमध्ये कोणताच खेळाडू पुढे आला नव्हता. आता या जिल्ह्याचं क्रिकेटचं स्वप्न देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. रॉबिन मिंजने आता मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान मिळवलं असून तो 2025 चं आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज झालाय. 

आयपीएल 2024 च्या हंगामात रॉबिन मिंज याचं नाव पहिल्यांदा चर्चेत आलं होतं. सिलम पांदनटोलीमधील   रायडीह प्रखंड या छोट्या गावातून आयपीएलच्या जगात पोहोचण्याचा पराक्रम रॉबिन मिंज याने करुन दाखवलाय. आदिवासी कुटुंबातून येणाऱ्या रॉबिनच्या या यशाचं संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात कौतुक करण्यात येत आहे. एका आदिवासी खेळाडूने क्रिकेटच्या मोठ्या लीगमध्ये स्थान मिळवणे ही काय सोपी गोष्ट नाही. मात्र, हा प्रवास रॉबिनने त्याच्या मेहनतीने यशस्वी करुन दाखवलाय. 

रांचीमध्ये घेतलं क्रिकेटचं ट्रेनिंग 

रॉबिन मिंज एका मुलाखतीत म्हणाला, लहानपणापासूनचं क्रिकेटमध्ये करिकर करायचं, अशी रॉबिनची इच्छा होती. रॉबिन 7-8 वर्षांचा होता, तेव्हापासूनच त्याला क्रिकेटचं वेड होतं. आमचा त्याच्यावर विश्वास आहे आणि आशीर्वाद आहे की त्याने देशासाठी क्रिकेट खेळावं. रॉबिनचे वडिल जेवियर मिंज हे सैन्यात काम करत होते. तेव्हा आम्ही रांचीला गेलो होतो. तेव्हा रॉबिनने तेथेच शिक्षण आणि सोबत क्रिकेटचा सराव सुरु केला होता. 

जेवण्यासाठी आणलेली लाकडं घेऊन क्रिकेटचा सराव 

रॉबिनचे गावकरी लालमोहन लोहरा म्हणाले, रॉबिने जेवण्यासाठी आणलेली लाकडं घेऊन गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळलंय. गावातील मुलं प्लास्टिक आणि टेनिसच्या बॉलने क्रिकेट खेळायचे. त्यांच्यामध्येच रॉबिन सराव करायचा. आता आयपीएलला सुरुवात होणार आहे, आमचा रॉबिन मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. आम्हाला आशा आहे की, तो चांगली कामगिरी करेल. मोठे षटकार मारेन. पुढे तो भारतीय संघात स्थानही मिळवेल. 

मागील वर्षी अपघात झाल्याने खेळू शकला नाही आयपीएल 

गेल्या आयपीएल लिलावात रॉबिन मिंजला गुजरात टायटन्स संघाने 3 कोटी 60 लाख रुपयांना खरेदी केले होते. पण, दुर्दैवाने रस्ते अपघातात झालेल्या दुखापतीमुळे रॉबिनला गेल्या वर्षीच्या आयपीएल हंगामात खेळता आले नव्हते. यावेळी तो नक्कीच खेळू शकेल, अशी सर्वांना आशा आहे. यावेळी आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सने रॉबिनसाठी 65 लाखांची बोली लावली आहे. रॉबिन मिंज स्फोटक फलंदाजी आणि यष्टिरक्षणासाठी ओळखला जातो. मिंज हा पहिला आदिवासी क्रिकेटपटू आहे जो आयपीएल खेळताना दिसणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जर पायलट नाही तर विमानात कशाला बसवता? तासभर ताटकळल्यानंतर डेव्हिड वॉर्नर रागाने लाल, सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केला संताप

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ban vs Pak 3rd ODI : पाकिस्तानाचा झिम्बाब्वे झालाय? लाज वाटू द्या...; बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज संतापला, नको नको ते बोलला
पाकिस्तानाचा झिम्बाब्वे झालाय? लाज वाटू द्या...; बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज संतापला, नको नको ते बोलला
Harshit Rana News : हातात काठी, लंगडत पोहोचला... हर्षित राणाच्या 15 सेकंदांच्या व्हिडीओने क्रिकेट विश्वात खळबळ; नेमकं काय घडलं?
हातात काठी, लंगडत पोहोचला... हर्षित राणाचा 15 सेकंदांचा व्हिडीओ पाहून सगळे हादरले; नेमकं काय घडलं?
BAN vs PAK 3rd ODI : ICC ची ट्रॉफी चोरुन आणायची का?; पाकिस्तानच्या माजी खेळाडूने सुनावलं, कधीही न बोललेले शब्द बोलून गेला
ICC ची ट्रॉफी चोरुन आणायची का?; पाकिस्तानच्या माजी खेळाडूने सुनावलं, कधीही न बोललेले शब्द बोलून गेला
BAN vs PAK 3rd ODI : 11 वर्षांनंतर मानहानीकारक पराभव अन् पाकिस्तानचे रडगाणे सुरू... थेट ICC कडे तक्रार, शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?
11 वर्षांनंतर मानहानीकारक पराभव अन् पाकिस्तानचे रडगाणे सुरू... थेट ICC कडे तक्रार, शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Donald Trump on Nato: इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
Odisha Government Hospital Fire: जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
Maharashtra Weather Alert: सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
Embed widget