एक्स्प्लोर

Praful Patel & Nana Patole : कट्टर विरोधक प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट; एकाच व्यासपीठावर मनमोकळ्या गप्पा

Praful Patel and Nana patole : राजकीय व्यासपीठावरून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करणारे प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले हे एकाच व्यासपीठावर आले होते.

Praful Patel and Nana patole : राजकीय व्यासपीठावरून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) या दोघांनी आज रविवारी (दि. 02) एकमेकांची गळाभेट घेत मनमोकळ्या गप्पा मारल्या. भंडारा जिल्ह्याच्या पिंपळगाव येथे शंकरपट शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी घेतलेली गळाभेट काही वेगळे राजकीय संकेत तर, देत नाही ना, अशी कुजबूज आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र आणि त्या अंतर्गत येत असलेल्या सातही विधानसभा मतदारसंघांवर आपलेच वर्चस्व राहावे, याकरिता प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांच्यात राजकीय संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांनी एकमेकांवर जोरदार प्रहार केल्याचे पाहायला मिळाले. 

विधानसभेत एकमेकांवर जोरदार टीकास्त्र

विधानसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोण होणार? याची जोरदार चर्चा रंगली होती. नाना पटोले यांनी आमगाव येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये भाषणादरम्यान मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्ष होकार दिला होता. राजकुमार पुराम याला आमदार बनवायचे आहे. नाही बनवलं तुम्ही तर महाराष्ट्रात नानाभाऊ उद्या काय बनणार आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही एक एक आमदार नाही दिले तर अडचण येणार आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी मुख्यमंत्रि‍पदासाठी अप्रत्यक्ष होकार दिल्याचे दिसून आले होते. यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार पलटवार केला होता. नाना पटोले हे स्वयंभू घोषित मुख्यमंत्री आहेत. अशा म्हणण्याने कुणी काही बनत नाही. महाराष्ट्रामध्ये तुमचे सरकार आले पाहिजे, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले होते. 

प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट

यानंतर विधानसभेच्या अनेक सभांमध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांच्यावर विधानसभा निवडणुकीत मात केल्याचे पाहायला मिळाले. भंडारा जिल्ह्यातील विधानसभेच्या सातपैकी सहा जागा जिंकून पटेल यांनी वर्चस्व गाजवले. यात त्यांना भाजपची मोलाची साथ मिळाली होती. आता विधानसभा निवडणुकीनंतर प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले हे पहिल्यांदाच कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला एकत्र आले. यावेळी दोघांनी गळाभेट देखील घेतली. या दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या गळाभेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.   

आणखी वाचा 

Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget