युवा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी जिंकला ICC अंडर-19 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
U19 Women T20 World Cup 2025 : भारतानं सलग दुसऱ्यांदा कोरलं महिला अंडर-19 वर्ल्ड कपवर नाव!

India Beat South Africa To Win U19 Women T20 World Cup 2025 : जवळजवळ दोन आठवड्यांच्या रोमांचक सामन्यांनंतर 19 वर्षांखालील महिला टी-20 वर्ल्ड कप 2025 चा विजेता सापडला आहे. यावेळी स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये खेळवण्यात आला. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथील बेयुमास ओव्हल स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते. या सामन्यात भारतीय संघाने अगदी सहज विजय मिळवला आणि विजेतेपदावर कब्जा केला. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. याआधी 2023 मध्येही टीम इंडिया चॅम्पियन बनली होती.
भारतानं सलग दुसऱ्यांदा कोरलं महिला अंडर-19 वर्ल्ड कपवर नाव!
या स्पर्धेत निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी खूपच संस्मरणीय होती. या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही आणि विजेतेपद पटकावले. दोन्ही संघांमध्ये झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण संपूर्ण संघ 20 षटकांत फक्त 82 धावा करू शकला आणि सर्वबाद झाला. या काळात, दक्षिण आफ्रिकेसाठी मिके व्हॅन वुर्स्टने सर्वाधिक 23 धावा केल्या. त्यांच्याशिवाय, जेम्मा बोथा16 आणि फेय काउलिंगने 15 धावा केल्या.
दुसरीकडे, भारताकडून गोंगडी त्रिशाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. गोंगडी त्रिशाने 4 षटकांत फक्त 15 धावा दिल्या आणि 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला आणि पारुनिका सिसोदियाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. शबनम शकीलनेही एका फलंदाजाची विकेट घेण्यात यश मिळवले.
टीम इंडियाने सहज गाठले लक्ष्य
अंतिम सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 83 धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारतीय संघाने हे लक्ष्य अगदी सहज गाठले. यादरम्यान, सलामीवीर गोंगडी त्रिशा आणि कमलिनीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी फक्त 4.3 षटकांत 36 धावा जोडल्या. त्यामुळे भारतीय संघाने केवळ 1 विकेट गमावून लक्ष्य गाठले आणि सामना जिंकला. गेल्या वर्षीही भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ पुरुषांच्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत एकमेकांसमोर आले होते. तेव्हाही टीम इंडिया जिंकली होती.
𝗖. 𝗛. 𝗔. 𝗠. 𝗣. 𝗜. 𝗢. 𝗡. 𝗦! 🏆#TeamIndia 🇮🇳 are the ICC U19 Women’s T20 World Cup 2025 Champions 👏 👏
— BCCI Women (@BCCIWomen) February 2, 2025
Scorecard ▶️ https://t.co/hkhiLzuLwj #SAvIND | #U19WorldCup pic.twitter.com/MuOEENNjx8
2025 च्या अंडर 19 महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे जवळपास सगळे सामने एकतर्फी झाले. आधी वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव करून सुरुवात केली. यानंतर, भारतीय संघाने मलेशियाचा 10 विकेट्सने पराभव केला आणि नंतर श्रीलंकेचा 60 धावांनी पराभव केला. त्याच वेळी, त्यांनी बांगलादेशविरुद्ध 8 विकेट्सने आणि स्कॉटलंडविरुद्ध 150 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी उपांत्य फेरीत इंग्लंडचा 9 विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता आम्ही अंतिम सामनाही सहज जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
