पाणी फाऊंडेशनचं तुफान महाराष्ट्रभर पुन्हा येणार, आमिर खानची घोषणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ
Amir Khan Pani Foundation: महाराष्ट्रातील विशेषत: मराठवाड्यातील काही गावांमध्ये पानी फाऊंडेशनचे काम झाले. आता महाराष्ट्रभर पाणी फाऊंडेशन काम करणार असल्याची घोषणा करण्यात आलीय.

Amir Khan: आम्ही आता पाणी फाउंडेशनचे काम राज्यभर करणार आहोत. पुढच्या वर्षीपासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात हे काम करूअशी घोषणा अभिनेता आमिर खाननं (Amir Khan) केली आहे. काही मोजक्या गावांमध्ये नाही तर आता राज्यभरातील अनेक गावांमध्ये पाणी फाऊंडेशनचं तुफान पुन्हा येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या नव्या उपक्रमाचा शुभारंभ पुण्यात करण्यात आला. 3 वर्षांपूर्वी एक स्वप्न घेऊन आम्ही पुढे आलो होतो. ते स्वप्न शेतकऱ्यांसाठी होतं. शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो, पीक कसे वाढवता येईल हे सगळे मुद्दे घेऊन समोर आलो होता. देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो की ते आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले म्हणून दरवर्षी आम्ही यशस्वी होत गेलो. असेही ते म्हणाले. (Pani Foundation)
काय म्हणाले आमिर खान?
देवेंद्रजी प्रत्येक वर्षी तुम्ही मला एक गोष्ट विचारत की हे काम घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही कधी जाणार आहात? पण आम्हाला थोडी भीती वाटते कारण ही जिम्मेदारी खूप मोठी आहे आपला महाराष्ट्र जर्मनी पेक्षा खूप मोठा आहे म्हणून भीती वाटते की राज्यभर आपण पाणी फाउंडेशनच काम घेऊन जाऊ शकतो का? आम्ही आता पाणी फाउंडेशनचे काम राज्यभर करणार आहोत.पुढच्या वर्षीपासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात हे काम करू.पाणी फाउंडेशनचे काम आता संपूर्ण महाराष्ट्रात करणार असल्याचे अभिनेता आमिर खान म्हणाले. पाणी फाउंडेशन आता संपूर्ण राज्यभर काम करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.पुढच्या वर्षीपासून राज्यभरतील अनेक गावांमध्ये पाणी फाउंडेशन काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या नव्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो, पीक कसे वाढवता येईल हे सगळे मुद्दे घेऊन समोर आलो होता.गट शेती करण्याचा प्रयत्न आम्ही केला. असेही अमिर खान म्हणाले.
आमीर खानने त्याच्या सत्यमेव जयते मार्फत दुष्काळाचं आव्हान पेलण्याचे ठरवले. काही वर्षांपूर्वी पाणी फाउंडेशनची स्थापना केली गेली. सत्यमेव जयतेच्या वैशिष्ट्याप्रमाणे दुष्काळी भागात फिरून उपलब्ध जलसाठे, पावसाचे प्रमाण इत्यादी आवश्यक माहिती गोळा केली गेली. त्यानंतर दुष्काळाला हरवण्याचा प्लान बनवण्यात आला. महाराष्ट्रातील विशेषत: मराठवाड्यातील काही गावांमध्ये पानी फाऊंडेशनचे काम झाले. आता महाराष्ट्रभर पाणी फाऊंडेशन काम करणार असल्याची घोषणा करण्यात आलीय.

























