Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पुर्णपणे बुद्धू,प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यआताची पिढी पुर्णपणे बुद्दू असल्याचं परखड मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यनी व्यक्त केलंय. आजची पिढी विचार करीत नसून ती आत्मकेंद्रित झाल्याचं विधान आंबेडकरांनी केलंय. ते आज अकोल्यातील सीताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एका राष्ट्रीय परिसंवादात बोलत होतेय. 'भारतीय संविधान देशाच्या नवीनतम सर्वांगीण विकासाचा पाया' असा या परिसंवादाचा विषय होता. अमेरिकेतील नव्या ट्रम्प सरकारच्या धोरणामुळे 23 लाख भारतीयांना देशात परत यावं लागणार असल्याची भीती आंबेडकरांनी व्यक्त केलीये.ब्रह्मपुत्रा ही ईशान्येतील 'सेव्हन सिस्टर आणि वन ब्रदर' यांना जोडणारी नदी आहेय. मात्र याच नदीवर चीन सात धरणं बांधायची योजना आखत आहेय. ही सात धरणं बांधली गेली तर ब्रह्मपुत्रेचं पाणी आपल्याला मिळणार नसल्याचं आंबेडकर म्हणालेय. असं झालं तर ईशान्येतील सात राज्य चीनसोबत जाण्याचा विचार करू शकतात, अशी धक्कादायक भीती आंबेडकरांनी व्यक्त केलीये.