एक्स्प्लोर
Dhananjay Munde: धनंजय मुंडे गहिवरले, थांबले; तो प्रश्न विचारताच भावूक; मंत्रालयाबाहेरील माध्यमांच्या गराड्यात काय घडलं?
Dhananjay Munde: मंत्रिमंडळाची बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली.
Dhananjay Munde
1/7

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (28 जानेवारी) मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजेरी लावली.
2/7

मंत्रिमंडळाची बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली.
3/7

देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी संतोष देशमुखांची ज्यांनी हत्या केली त्या आरोपींना फास्ट ट्रॅकवर केस चालवून फासावर चढवलं पाहिजे, ही मी भूमिका स्पष्ट केली आहे, आजही हीच भूमिका आहे, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं.
4/7

बातम्या पेरायच्या हे सुरु आहे.बीडशिवाय माध्यमांवर काही सुरु नाही. माध्यमांचा मान सन्मान बीडमध्ये कमी होतोय. आपण काय खरं काय खोट याची तपासणी करावी, अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली.
5/7

धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. माध्यमांनी धनंजय मुंडेंना विरोधकांकडून राजीनामा मागितला जातोय, असा प्रश्न विचारला. यानंतर धनंजय मुंडे थोडे गहिवरल्याचे दिसून आले.
6/7

धनंजय मुंडे म्हणाले की, ज्यावेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात, थेट तुमच्यावर आणि तुम्हाला जर लहान मूल असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना...तर त्या मुलीला तिच्या मैत्रिणी आणि मित्र काय म्हणत असतील याचा विचार करा, असं धनंजय मुंडे म्हणाले.
7/7

राजीनामा या विषयावर मी काही उत्तर देणार नाही, असंही धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
Published at : 28 Jan 2025 02:19 PM (IST)
आणखी पाहा























