एक्स्प्लोर

MS Dhoni Retirement News : 'मी व्हीलचेअरवर पण...' मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्याआधी MS धोनीने सांगितला निवृत्तीचा प्लॅन, CSK चाहत्यांची धाकधुक वाढली

MS Dhoni on IPL Retirement : आयपीएलचा 18 वा हंगाम 22 मार्च रोजी मोठ्या धुमधडाक्यात सुरू झाला आहे.

MS Dhoni breaks silence on retirement : आयपीएलचा 18 वा हंगाम 22 मार्च रोजी मोठ्या धुमधडाक्यात सुरू झाला आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीने केकेआरला हरवून विजय मिळवला. आता तिसरा सामना दोन बलाढ्य संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI VS CSK) यांच्यात होणार आहे, ज्यांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आता या हाय व्होल्टेज  सामन्यापूर्वी, एमएस धोनीने त्याच्या निवृत्तीबद्दल एक मोठे विधान केले आहे.

हा हाय व्होल्टेज सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. धोनीचा हा 18 वा हंगाम आहे आणि तो 16 व्यांदा चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळणार आहे. दरवर्षी जसजसे आयपीएल जवळ येते तसतसे माहीच्या निवृत्तीच्या बातम्याही जोर धरू लागतात, ज्यावर आता या क्रिकेटपटूने पूर्णविराम दिला आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्याआधी MS धोनीने सांगितला निवृत्तीचा प्लॅन

धोनीने गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले होते, ज्यामुळे तो 2024 मध्ये स्पर्धेतून निवृत्त होणार  अशी अटकळ बांधली जाऊ लागली होती. पण, यावर्षीही धोनी यलो संघाला विजय मिळवून देण्यासाठी कठोर परिश्रम करताना दिसेल. आता मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी, त्याने आयपीएल २०२५ च्या ब्रॉडकास्टरशी झालेल्या संभाषणात त्याच्या निवृत्तीबद्दलचे मौन सोडले आहे.

धोनी म्हणाला की, 'मी जोपर्यंत माझी इच्छा आहे तोपर्यंत मी सीएसकेसाठी खेळू शकतो. ही माझी फ्रँचायझी आहे.  मी व्हीलचेअरवर असलो तरी ते मला मैदानात ओढतील. 2023 मध्ये गुडघ्याच्या दुखापतीनंतर एमएस धोनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

आयपीएलमध्ये धोनीचा रेकॉर्ड

धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला पाच ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. माजी कर्णधाराने आतापर्यंत 264 आयपीएल सामने खेळले आहेत. धोनीने 39.13 च्या सरासरीने आणि 137.54 च्या स्ट्राईक रेटने एकूण 5243 धावा केल्या आहेत. धोनीने त्याच्या शानदार आयपीएल कारकिर्दीत 24 अर्धशतकेही झळकावली आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद.

हे ही वाचा - 

NZ vs PAK T20 : पाकिस्तान चारी मुंड्या चित! चौथ्या टी-20 मध्ये लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने मालिका घातली खिशात

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget