Eknath Khadse: नागपूर येथील दंगल प्रकरणाची पोलीस विभागाकडून कसून चौकशी सुरू आहेत. हा प्रसंग संपुर्ण देशाचं लक्ष वेधण्याचं प्रसंग आहे. नागपूर सारख्या शांतताप्रिय शहरात बाहेरून लोक येवून दंगल घडवितात. यात मालेगाव कनेक्शन जर असेल तर मालेगावकडे लक्ष देण्याची गरज आहे. असे कृत्य करणाऱ्यांकडे पोलीसांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ही दंगल पुर्वनियोजित आहे तर सरकार नेमकं काय करत होते?, याकडे अधिक लक्ष दिलं असतं तर ही घटना घडली नसती. सरकार जर सांगत असेल की ही दंगल पूर्वनियोजन आहे, तर हे गृह खात्याचे मोठे अपयश असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सरकारवर केली. मोठ्या प्रमाणात ट्रॉली मधून दगड आणले होते जर असं सांगितलं जात आहे तर, गुप्तचर यंत्रणा, स्थानिक पोलीस एलसीबी काय करत होते?, हा मोठा प्रश्न आहे. गृहका त्याने काळजी घेतली असती तर कदाचित या दंगलीची तीव्रता कमी राहिली असती. असा सवालही खडसेंनी केलाय. दरम्यान, राज्यात दिशा सालियन, औरंगजेब या प्रश्नाऐवजी कितीतरी महत्त्वाचे प्रश्न आहेत. महिलांचे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासह इतर प्रश्नांवर कितीवेळ विधानसभेत चर्चा होते? असा सवालही त्यांनी केलाय. जळगावमधून ते बोलत होते.
नागपूर सारख्या शांतताप्रिय शहरात बाहेरून लोक येवून दंगल घडवितात. यात मालेगाव कनेक्शन जर असेल तर मालेगावकडे लक्ष देण्याची गरज आहे. असे कृत्य करणाऱ्यांकडे पोलीसांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ही दंगल पुर्वनियोजित आहे तर सरकार नेमकं काय करत होते?, याकडे अधिक लक्ष दिलं असतं तर ही घटना घडली नसती. सरकार जर सांगत असेल की ही दंगल पूर्वनियोजन आहे, तर हे गृह खात्याचे मोठे अपयश आहे. मोठ्या प्रमाणात ट्रॉली मधून दगड आणले होते जर असं सांगितलं जात आहे तर, गुप्तचर यंत्रणा, स्थानिक पोलीस एलसीबी काय करत होते?, हा मोठा प्रश्न आहे. गृहका त्याने काळजी घेतली असती तर कदाचित… Read more 4:04 pm ">
तुमची उणीदुणी अधिवेशनच्या बाहेर सोडविता आली असती: एकनाथ खडसे
विधानसभा ही महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी आहे. शेतकऱ्यांचे, नोकरदारांचे, शेतमजूरांचे, मजूरांचे प्रश्न आहेत. राज्यात अनेक चालीरिती संदर्भात उपाययोजनाचे प्रश्न आहेत. महागाईचे विषय आहेत, शेतकरी कर्जमुक्त, विजेचे प्रश्न सोडविण्यासाठी हे अधिवेशन आहे. तुमची उनीदुणी अधिवेशनच्या बाहेर सोडविता आले असतो. मला वाटतं विधासभेचा सर्व सदस्यांनी चिंतन करण्याची गरज आहे. दिशास सालियन आणि औरंगजेब या प्रश्नाऐवजी कितीतरी सामाजीक प्रश्न महत्वाचे आहेत. महिलांचे विषय, शेतकरी आत्महत्या यासह इतर प्रश्नांवर कितीवेळा विधानसभेत चर्चा होते.
शेतकरी आत्महत्यांकडे कुणीही लक्ष देत नाहीत
जळगाव जिल्ह्यातील १४ महिन्यांत २०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अगदी २८ दिवसात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जळगाव जिल्हा तसा पाहिला समृध्द आहे असं समजलं जात. अश्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतात याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे. आज राज्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, दुष्काळाला सामोरं लागत आहे. या प्रश्नांकडे विधानसभेत चर्चा होत आहे. याकडे कुणीही लक्ष देत नाही. मी अनेक वेळा शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत मांडतो, याला इतरांनी देखील साथ द्यावी, अशी अपेक्षा करतो. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाला व भाजीपाला याला हमी भाव मिळत नाही, यातील भाजीपाला हा लवकर खराब होणारी वस्तू आहे. त्याला वेळेत भाव मिळालं तर ठिक नाहीतर रस्त्यावर फेकावं लागतं. पण सरकारने याची मध्यस्थी केली पाहिजे एका विशिष्ट किंमतीच्या खाली विकता येणार नाही असा कायदा केला पाहिजे. यासाठी आपण सातत्याने विधानसभेत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला आहे.
माझ्या नातीसोबत छेडछाडीचा प्रकार
अलिकडच्या काळात महाराष्ट्र महिलांवर अत्याचार होत आहे. पोलीस विभागा या प्रकरणाकंडे सजग नाही हे धरणगाव प्रकरणावरून दिसून येत आहे. असे प्रकरण अनेक ठिकाणी होत आहे. असाच प्रकार निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घडली आहे. अगदी माझ्या नातीसोबत छेडछाडीचा प्रकार घडला आहे. पण पोलीसांनी अद्याप गुन्हेगार पकडण्यात यश आलेले नाही. पोलीस अधिकारी हे हप्ते आणि पैसे वसूल करण्यात व्यस्त आहे. गुन्हगारांवर पोलीसांचा वचक राहिलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.