INDIA Alliance : इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
INDIA Alliance : राज्यात महाविकास आघाडी सुद्धा संकटात असल्याने ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्याने भूवया उंचावल्या आहेत. दिल्लीमध्येही आप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोपांच्या फैरी सुरु आहेत.

INDIA Alliance : आम्ही इंडिया आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीत एकत्र होतो, पण आता नाही. आघाडीची स्थापना केल्यापासून ती राज्यांत चालणार नाही, हे स्पष्ट होते. त्याची कार्यप्रणाली राज्यांच्या राजकीय स्वभावावर अवलंबून असेल. त्यामुळे इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून वाचू नये, आणि त्याचा आनंदही साजरा करु नये. तसेच आता इंडिया आघाडीचे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत असे म्हणायला नको, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांनी दिली आहे. राज्यात महाविकास आघाडी सुद्धा संकटात असल्याने शशी थरुर यांच्या वक्तव्याने भूवया उंचावल्या आहेत. दिल्लीमध्येही आप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोपांच्या फैरी सुरु आहेत. राज्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
खासदार शशी थरूर आज (2 फेब्रुवारी) जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी राजस्थानला पोहोचले. जिथे त्यांनी महोत्सवाच्या तिन्ही सत्रात भाग घेतला. साहित्याच्या सर्वात मोठ्या कुंभमेळ्याला हजेरी लावताना त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. पत्रकार परिषदेत त्यांनी अर्थसंकल्प 2025, महाकुंभ आणि इंडिया आघाडीसह अनेक विषयांवर आपली मते मांडली.
अर्थसंकल्पात काहीच नाही
अर्थसंकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले की, या अर्थसंकल्पात काहीच नाही. तुम्हाला करसवलत मिळत असेल पण तुमच्या खिशात पैसे येत नाहीत. मी संपूर्ण अर्थसंकल्पात बेरोजगारी हा शब्द ऐकला नाही. जर तुम्ही दिल्ली आणि बिहारसारख्या राज्यांमधून रोजगाराच्या शोधात येत असाल तर यामुळे तुमची निराशा होईल. जर तुमचा पगार 1 लाख रुपये असेल तर ते तुम्हाला आनंदी करेल.
धर्म ही वैयक्तिक बाब आहे
तुम्हाला मंदिरात किंवा कुंभात जायचे असेल तर तुमची बाब आहे. राम मंदिरात जायचे की नाही याचा निर्णय माझा पक्ष किंवा अन्य पक्ष घेणार नाही. मी कुंभमध्ये जाऊन सुरक्षा, व्हीआयपी ट्रीटमेंट घेतली आणि त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत असेल तर मला जायला आवडणार नाही. नेहरूजी 1957 मध्ये एकदा गेले होते आणि त्यादरम्यान दूर कुठेतरी चेंगराचेंगरी झाली आणि काही लोक मरण पावले. त्यामुळे व्हीआयपींनी अशा ठिकाणी जाऊ नये, सर्वसामान्यांना जाऊ द्यावे, म्हणून मी जाणार नाही, असे ते म्हणाले. माझ्या कर्मचाऱ्यांपैकी कोणाला जायचे असेल तर तो जाऊ शकतो, मी मदत करेन पण मी सनातनी असल्याचा पुरावा देण्याचा अधिकार कोणालाही देणार नाही.
सात-आठ महिन्यांपासून मजूर मनरेगाच्या पैशांच्या प्रतीक्षेत आहेत
यापूर्वी त्यांनी 10,000 कोटी रुपयांच्या रोजगार निर्मितीबद्दल सांगितले होते, परंतु नंतर ते 6,000 कोटी रुपये केले. यावर उपाय नाही. फक्त याकडे लक्ष दिले पाहिजे. सरकार काही लोकांना फायदा करून देण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे समाजातील एका मोठ्या वर्गाचे नुकसान होत आहे. मनरेगा कामगार सात-आठ महिन्यांपासून पैशांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र ते सरकारचे प्राधान्य नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
