माझ्याकडे लक्ष द्या, माझंही पुनर्वसन करा, माजी खासदार सुजय विखे पाटलांची मागणी, म्हणाले मी एकटाच 'माजी'
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील भाजपचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी भाजप आमदारांच्या सत्कार समारंभात आपल्या पुनर्वसनाची मागणी केली आहे.

Sujay Vikhe Patil : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील भाजपचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी भाजप आमदारांच्या सत्कार समारंभात आपल्या पुनर्वसनाची मागणी केली आहे. नगर शहरात भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच नवंनिर्वाचित आमदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या सत्कार समारंभासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह महायुतीच्या दहा पैकी आठ आमदारांनी हजेरी लावली. या सत्कारसमारंभामध्ये माजी खासदार सुजय विखे यांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील?
आपल्या भाषणांमध्ये बोलताना सुजय विखे यांनी म्हणाले की, या मंचावर सर्वच "आजी" आहेत मी एकटाच "माजी" आहे. माझ्याकडेही सर्वांनी लक्ष द्यावं आणि माझंही पुनर्वसन करावं असं विखे पाटील म्हणाले. विखे पाटील यांच्या विनंतीला प्रतिसाद देत सर्व आमदारांनी जिल्ह्यातील महायुतीच्या यशामध्ये विखेंचा सहभाग मोठा असल्यानं तुमचं पुनर्वसन निश्चित होईल असं आश्वासन दिलं आहे.
लोकसभेला सुजय विखे पाटील यांचा 29 हजार 317 मतांनी पराभव झाला होता
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठा फटका बसला होता. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली होती. यामध्ये राज्यातील अनेक जागांवर धक्कादायक निकालांची नोंद झाली होती. यामध्येच एक म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदार संघाचा निकाल. भाजपचेनेते सुजय विखे-पाटील यांना मोठा धक्का बसला होता. शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी विखेंचा पराभव केला होता. हा विखे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार गटाकडून उभे राहिलेल्या निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा 29 हजार 317 मतांनी पराभव केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी विजय मिळवला होता. विद्यमान खासदारच निवडणुकीला पडल्याने राज्यभरात मोठी चर्चा झाली होती. पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन निलेश लंके यांनी अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत लढवली होती. या लढतीची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली होती. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही राज्यातील प्रमुख लढतीपैंकी एक मानली जात होती. अखेर या निवडणुकीत निलेश लंके यांनी बाजी मारली होती.
महत्वाच्या बातम्या:
नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, विखे पाटील याचिका दाखल करणार, अहिल्यानगरमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

