एक्स्प्लोर

Nagpur : हिंसाचारग्रस्त नागपुरातली संचारबंदी सहा दिवसांनी पूर्णपणे मागे, पोलिस बंदोबस्त मात्र कायम

Nagpur Violence : येत्या काळात सोशल मीडियाच्या वापरावर पोलिसांची कडक नजर राहणार असल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी दिली.

नागपूर : गेल्या सहा दिवसांपासून नागपूरमध्ये लागू असलेली संचारबंदी हटवण्यात आली आहे. गेल्या सोमवारी नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारानंतर 11 पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती आता उठवण्यात आली आहे. संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलिसांनी हिंसाग्रस्त भागात रुटमार्चही काढला. गणेशपेठ, कोतवाली , तहसील आणि यशोधरा नगर या भागात संचारबंदी उठवताच बाजापेठा उघडायला सुरवात झाली. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबच्या कबरीवरुन (Aurangzeb Tomb) झालेल्या वादानंतर 17 मार्च रोजी नागपूरमध्ये दंगल उसळली होती. 

संचारबंदी उठल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी हिंसाचाराचे केंद्र राहिलेल्या भालदारपुरा या भागाची पाहणी केली. यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी नागपूरची स्थिती नियंत्रणात असून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संचार बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. पुढील काळात सोशल मीडियाच्या वापरावर पोलिसांची कडक नजर राहणार असल्याचे देखील पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सांगितलं. 

नागपूरमधील अग्रेसन चौक, चिटणवीस पार्क , शिवाजी चौक ,गांधीगेट , महाल मार्केट हंसापुरी , मोमीनपुरा भागातून रुट मार्च काढण्यात आला. संचारबंदी हटवल्यानंतर या परिसरातील दुकानं उघडायलाही सुरुवात झाली आहे. हिंसाचारामुळे नागपुरात निर्माण झालेला तणाव आता निवळला असून जनजीवन पूर्ववत होवू लागल्याने नागपूरकरांकडूनही समाधान व्यक्त केलं जातंय.

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वाद सुरू आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील (Khultabad) कबर हटवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. नागपुरात औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे दंगल झाली. 

104 दंगलखोरांची ओळख पटली

नागपूर दंगल प्रकरणात पोलिसांनी चार-पाच तासांत दंगल नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. या सगळ्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर पोलिसांनी दंगलीचे सीसीटीव्ही फुटेज, लोकांना मोबाईलवर केलेले चित्रीकरण याआधारे दंगेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आतापर्यंत 104 दंगलखोरांची ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक केली आहे. तर 12 जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही विधिसंघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरु आहे. 

हिंसाचार करणाऱ्या कुणालाही या प्रकरणातून सोडले जाणार नाही. पोलिसांवर हल्ला करणे हे अतिशय गंभीर बाब असून अशा हल्लेखोरांना जर सोडलं तर हे कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टीने योग्य नाही. परिणामी त्यांना अद्दल घडवल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

ही बातमी वाचा: 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
Babanrao Taywade : मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आकडेवारी मराठा अन् ओबीसी दोन्ही समाजाची दिशाभूल करणारी; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा गंभीर आरोप
मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आकडेवारी मराठा अन् ओबीसी दोन्ही समाजाची दिशाभूल करणारी; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा गंभीर आरोप
धक्कादायक! नागपुरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार, पती पत्नीने मिळून केली प्रियरकाची हत्या
धक्कादायक! नागपुरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार, पती पत्नीने मिळून केली प्रियरकाची हत्या
Maharashtra Budget 2026: गडचिरोलीमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक, नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी; अर्थसंकल्पात नागपूरसह विदर्भाच्या वाट्याला काय?
गडचिरोलीमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक, नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी; अर्थसंकल्पात नागपूरसह विदर्भाच्या वाट्याला काय?

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup Prize Money: T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
भारत -न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
Embed widget