एक्स्प्लोर

Mumbai News : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरांच्या चाव्या देणार

BDD Chawl Redevelopment : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या 556 घरांचं हस्तांतरण मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 556  घरांचं हस्तांतरण मार्च महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुंबईतील वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि शिवडीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या नेतृत्त्वात आणि राज्य सरकारच्या पाठिंब्यानं करण्यात येत आहे. वरळी येथे नव्यानं बांधकाम करण्यात आलेल्या अपार्टमेंटमधील 556 घरांच्या चाव्या मार्च 2025 मध्ये वरळी येथील बीडीडी चाळीतील पात्र रहिवाशांना करण्यात येणार आहे. यासंदर्भातील वृ्त्त इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालं आहे.

बीडीडी चाळी  1920 ते 1925 च्या दरम्यान ब्रिटीश सरकारकडून बांधण्यात आल्या होत्या. बीडीडीचं पूर्ण नाव बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असं होतं. ब्रिटिशांच्या काळात मुंबईत रोजगाराच्या निमित्तानं  येणाऱ्या कामगारांच्या आणि स्थलांतरितांच्या निवासाच्या  सोयीसाठी बीडीडी चाळी बांधण्यात आल्या  होत्या. नंतरच्या काळात गिरणी कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबासाठी महत्त्वाच्या ठरल्या. 

मुंबईत सध्या 207 बीडीडी चाळी आहेत. यापैकी वरळीत 121 , नायगावमध्ये 42, ना.म. जोशी मार्ग 32 आणि शिवडीत 12 चाळी आहेत ज्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. 

चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी प्रकल्पाचं अंदाजित मूल्य 16 हजार कोटी रुपये होते. बीडीडी चाळीतील जे रहिवासी सध्या 160 स्क्वेअर फुटांच्या घरांमध्ये राहतात त्यांना 500 स्क्वेअर फुटचं घर दिलं जाणार आहे. या प्रकल्पाचं पहिलं भूमिपूजन एप्रिल 2017 मध्ये झालं होतं.

म्हाडाकडून ऑगस्ट 2021 मध्ये वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथे कामाला सुरुवात करण्यात आली होती.  

वरळी येथे नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारत क्रमांक 1 च्या डी आणि ई विंगमील 556 घरांच्या चाव्या पात्र रहिवाशांना मार्च 2025 पर्यंत सोपवलं जाणं अपेक्षित आहे. वरळीत पहिल्या टप्प्यात 5198     घरांची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय म्हाडा उपलब्ध होणाऱ्या जागेत 1860 घरं मध्यमवर्ग उत्पन्न गटासाठी तर  1036 घरं उच्च उत्पन्न गटासाठी बांधणार असून लॉटरीद्वारे त्याची विक्री होईल.

वरळी येथील पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात 3974 घरांची बांधणी केली जाईल. म्हाडाला याठिकाणी 2184 घरं विक्रीसाठी उपलब्ध होतील. त्यात 1494 मध्यम उत्पन्न गट तर 1036 उच्च उत्पन गटासाठी असतील.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी  20 हजार कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे. वरळीसह नायगाव फेज 1 चं बांधकाम सुरु आहे. ना.म. जोशी मार्ग येथे 10  बीडीडी चाळींचं पाडकाम करण्यात आलं आहे. शिवडीतमध्ये जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम सुरु होईल.

इतर बातम्या : 

अर्थसंकल्पात म्युच्युअल फंड, शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रोत्साहन, नेमका काय होणार फायदा?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis & Eknath Shinde : फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या 'मित्रा'ला महत्त्वाच्या पदावरुन दूर केलं, आणखी एक धक्का, यंत्रणा मोडीत काढली
फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या 'मित्रा'ला महत्त्वाच्या पदावरुन दूर केलं, आणखी एक धक्का, यंत्रणा मोडीत काढली
TCS and Infosys Salary Hike: इन्फोसिस, TCS कंपनीच्या कर्मचाऱ्यांना झटका, यंदा कमी पगारवाढ, बोनसही तुटपुंजा?
इन्फोसिस, TCS कंपनीच्या कर्मचाऱ्यांना झटका, यंदा कमी पगारवाढ, बोनसही तुटपुंजा?
पन्हाळागड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल, येत्या पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरणास मान्यता देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
पन्हाळागड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल, येत्या पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरणास मान्यता देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
David Miller : दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, डेव्हिड मिलरची स्पर्धेच्या वेळापत्रकावर खदखद, फायनलमध्ये कुणाला पाठिंबा तेही सांगितलं
दुबईत 4 वाजता उतरलो, पुन्हा सकाळी 7.30 ला विमानात बसलो, डेव्हिड मिलरनं पराभवानंतर सगळंच काढलं, आयसीसीच्या कारभारावर नाराजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Adhiveshan Update | अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात काय काय घडलं? अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न कधी सुटणार?Pune Mahesh Motewar News | जामिनावर बाहेर आललेल्या महेश मोतेवारची पुन्हा पैसै गोळा करण्यास सुरुवातABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 07 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स NewSatish Bosale News | गुन्हा दाखल होऊनही सतीश भोसलेला अजून अटक का नाही?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis & Eknath Shinde : फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या 'मित्रा'ला महत्त्वाच्या पदावरुन दूर केलं, आणखी एक धक्का, यंत्रणा मोडीत काढली
फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या 'मित्रा'ला महत्त्वाच्या पदावरुन दूर केलं, आणखी एक धक्का, यंत्रणा मोडीत काढली
TCS and Infosys Salary Hike: इन्फोसिस, TCS कंपनीच्या कर्मचाऱ्यांना झटका, यंदा कमी पगारवाढ, बोनसही तुटपुंजा?
इन्फोसिस, TCS कंपनीच्या कर्मचाऱ्यांना झटका, यंदा कमी पगारवाढ, बोनसही तुटपुंजा?
पन्हाळागड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल, येत्या पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरणास मान्यता देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
पन्हाळागड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल, येत्या पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरणास मान्यता देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
David Miller : दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, डेव्हिड मिलरची स्पर्धेच्या वेळापत्रकावर खदखद, फायनलमध्ये कुणाला पाठिंबा तेही सांगितलं
दुबईत 4 वाजता उतरलो, पुन्हा सकाळी 7.30 ला विमानात बसलो, डेव्हिड मिलरनं पराभवानंतर सगळंच काढलं, आयसीसीच्या कारभारावर नाराजी
Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
Beed Crime Satish Bhosale: बीडच्या खोक्या भाईला हरीण अन् मोरांच्या शिकारीचा शौक, विरोध करणाऱ्याचे 8 दात पाडले, जबडा मोडला
बीडच्या खोक्या भाईला शिकारीचा शौक, 200 हरणं अन् अगणित मोर मारुन खाल्ले, पोलिसांची दोन पथकं मागावर
Embed widget