एक्स्प्लोर

IPL 2025 SRH vs RR : 34 चौकार, 12 गगनचुंबी षटकार अन् 286 धावा! आधी ट्रॅव्हिस हेडने चोपलं, मग इशान किशनने ठोकलं, राजस्थान रॉयल्ससमोर तगडं आव्हान

इशान किशनच्या झंझावाती शतक आणि ट्रॅव्हिस हेडच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2025 च्या पहिल्याच सामन्यात 287 धावा केल्या.

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, 2nd Match : इशान किशनच्या झंझावाती शतक आणि ट्रॅव्हिस हेडच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2025 च्या पहिल्याच सामन्यात 287 धावा केल्या. या हंगामातही सनरायझर्स हैदराबाद गेल्या वर्षीसारखी खेळत आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्याच षटकापासून हैदराबादच्या फलंदाजांनी त्यांचे इरादे स्पष्ट केले. या हंगामात शतक करणारा इशान किशन हा पहिला फलंदाज आहे. तर ट्रॅव्हिस हेडने 31चेंडूत 67 धावा केल्या.

इशान किशनचे तुफानी शतक

आयपीएल 2025 मध्ये इशान किशनने 45 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तो 47 चेंडूत 106 धावा करून नाबाद परतला. त्याने सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. इशानच्या बॅटने 11 चौकार आणि 6 षटकार मारले. सनरायझर्स हैदराबादने पॉवरप्लेमध्ये म्हणजेच पहिल्या 6 षटकांत 94 धावा केल्या होत्या. पण, हैदराबाद संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या फक्त दोन धावांनी हुकला. बरं, हा विक्रमही हैदराबादच्या नावावर आहे. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी या सामन्यात एकूण 34 चौकार आणि 12 षटकार मारले.

सनरायझर्स हैदराबादच्या सर्व फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. अभिषेक शर्माने 11 चेंडूत 5 चौकारांसह 24 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने 31 चेंडूत 67 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 9 चौकार आणि 3 षटकार लागले. नितीश कुमार रेड्डी याने 15 चेंडूत 30 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. हेनरिक क्लासेनने 14 चेंडूत 34 धावांची खेळी केली. क्लासेनने 5 चौकार आणि 1 षटकार मारला. सनरायझर्स हैदराबादने त्याच्या डावात एकूण 12 षटकार मारले. एसआरएच संघाने एकूण 34 चौकार मारले. ज्यामुळे त्याचे 287 धावा झाल्या.

जोफ्रा आर्चरचा आयपीएलमध्ये लाजिरवाणा विक्रम 

जोफ्रा आर्चरचा आयपीएलमध्ये एक लाजिरवाणा विक्रम आहे. आर्चरने चार षटकांत 76 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. आता तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज बनला आहे. संदीप शर्माने त्याच्या चार षटकांत 51 धावा दिल्या तर फिरकी गोलंदाज महेश दीक्षानाने त्याच्या चार षटकांत 52 धावा दिल्या. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने चार षटकांत 44 धावा देत तीन विकेट्स घेतल्या.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad: 'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad: 'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Maharashtra Rain news: गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर
Maharashtra Rain news: गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Embed widget