ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारीक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
अकलूजमध्ये राज्यस्तरीय लावणी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आज मोठ्या जल्लोषात या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आलं.

Akluj Lavani Competition : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अकलूजमध्ये राज्यस्तरीय लावणी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आज मोठ्या जल्लोषात या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आलं. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील आणि आयोजक स्वरुपाराणी मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पारंपारिक लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती असून हे जपण्याचे कामगिरी 31 वर्ष अकलूज येथील लावणी स्पर्धा करत आहे. या स्पर्धेतून आजवर शेकडो लावणी कलावंत महाराष्ट्राला दिले, ज्यांनी जगभर आपले नाव केले आहे.
पारंपारिक लावणी जपण्याचे काम महाराष्ट्रातील सर्वच रसिकांनी करावं
या स्पर्धेसाठी राज्यभरातून 10 संघ दाखल झाले आहेत. पहिल्या पाच संघाने आपली कला सादर केली आहे. राज्याची संस्कृती असलेली ही पारंपारिक लावणी जपण्याचे काम महाराष्ट्रातील सर्वच रसिकांनी करणे अपेक्षित असल्याची अपेक्षा आयोजक स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर आजच्या डॉल्बीच्या जमान्यात ही पारंपरिक लावणी टिकवण्यासाठी रसिकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे लावणी कलावंत वैशाली जाधव यांनी सांगितले. अकलूज लावणी स्पर्धा जोपर्यंत आहे, तोपर्यंत पारंपारिक लावणी कधीही बंद होऊ शकणार नसल्याचे मत लावणी कलावंत वैशाली जाधव यांनी व्यक्त केले. या स्पर्धेला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळत आहे.
पारंपारिक प्रेक्षक मोठ्या प्रमाणात
1993 साली प्रथम अकलूजमध्ये लावणी स्पर्धेला सुरुवात केली होती. जयसिंह मोहिते पाटील यांनी ही सुरुवात केली होती. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरु झाली होती. त्यानंतर 29 वर्षानंतर एक ते दोन वर्ष ही स्पर्धा थांबवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा मागील वर्षापासून लावणी स्पर्धा सुरु करण्यात आल्याची माहिती स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी दिली. स्पर्धेचे हे 31 वा वर्ष आहे. अस्सल पारंपारिक लावणी स्पर्धा याठिकाणी होते. पारंपारिक प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे स्वरुपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या. जोपर्यंत तुम्ही लावणी पाहत नाहीत तोपर्यंत तुम्हाला अस्सल लावणी काय आहे हे समजत नाही. पारंपारिक लावणी कशी जतन राहिल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचे स्वरुपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
Gautami Patil : लावणी नखापासून केसापर्यंत शृंगाराने सजलेली, गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट : डॉ. गणेश चंदनशिवे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
