एक्स्प्लोर

आज राज्यात कसं असेल हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. आजही हवामान विभागानं जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

Maharashtra Rain News : राज्यात सध्या ठिकठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) होत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळालं. दरम्यान, सुरु असलेल्या या जोरदार पावसामुळं धरणांमधील (Dam) पाणीपातळीत देखील वाढ होत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

'या' भागात ऑरेंज अलर्ट जारी

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती आण अकोला या चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

'या' भागात पावसाचा यलो अलर्ट जारी

दरम्यान, आज मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव तसेच मराठवाज्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीमवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

मुंबईत जोरदार पावसाची हजेरी

मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात मुसळधार झाला आहे. काल रात्रीपासून या सर्व भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी (Heavy Rain) बरसत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावंर पाणी साचलं होतं, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला होता. तसेच लोकलसेवा देखील उशीराने सुरु होती. दरम्यान, आजही मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

नागपूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस

नागपूर जिल्ह्यातही मुसळदार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळाल. उमरेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून शेतामध्ये ही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. उमरेड तालुक्यातील पाचगाव परिसरात संत्र्याची बाग असो किंवा सोयाबीनचे शेत सर्वांना तळ्याचे स्वरूप आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या पावसामुळे झाल्याचा प्राथमिक चित्र आहे. सोयाबीनची शेत आणि संत्र्याची बाग पूर्णपणे पाण्याखाली गेली असून एका तळ्याचा स्वरूप या बागेला आलेला आहे. तर तिकडे नागपूरच्या नरेंद्र नगर अंडर पास मध्ये पाणी साचल्याने रस्ता  बंद करण्यात आला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Heavy Rain in Mumbai & Thane: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, दुपारी समुद्राला भरती; लोकल ट्रेनला तुफान गर्दी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP On Mahapalika Election |  मनपात भाजपची स्वबळाची वाट, शिंदेंचा युतीसाठी आग्रह? Special ReportNew India Bank Scam | न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक कुणामुळे डुबली? Special ReportShanishingnapur Shanidev | एक मार्चपासून शनिदेवाला केवळ ब्रँडेड तेलानंच अभिषेक Special ReportSpecial Report Suresh Dhas:Dhananjay Munde यांच्या भेटीमुळे विश्वासार्हतेला तडा, विरोधकांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.