एक्स्प्लोर
बिहार दौऱ्यात मंत्री रामदास आठवलेंना शिर्डीतून फोन, ऑनलाईन पैशांची मागणी; असा फसला डाव
सध्या ऑनलाईन फ्रॉड आणि मोबाईल कॉलिंगद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामध्ये, बड्या अधिकाऱ्यांना वा मंत्र्यांनाही या गोष्टीचा फटका बसला आहे.

Ramdas Athawale cheating by call
1/8

सध्या ऑनलाईन फ्रॉड आणि मोबाईल कॉलिंगद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामध्ये, बड्या अधिकाऱ्यांना वा मंत्र्यांनाही या गोष्टीचा फटका बसला आहे.
2/8

आता, थेट केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना फोन करुन अपघाताची खोटी माहिती देत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार घडल्याची माहिती स्वत: मंत्रीमहोदयांनी पत्रकार परिषदेतून दिली.
3/8

बिहार दौऱ्यावर असताना केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंना महाराष्ट्रातून एक फोनकॉल आला होता. शिर्डीतून मी शिक्षक बोलतो, आमची सहल गोंदियाजवळ आली असून विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात झाल्याचे सांगून माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याचे आठवले यांनी सांगितले.
4/8

बिहार राज्याच्या दौऱ्यावर असताना मी शिर्डीतील असून आमच्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा अपघात झाला असून त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी पैसे कमी पडत असल्याची भावनिक साद घालण्यात आली होती.
5/8

रामदास आठवले यांनीदेखील तात्काळ दखल घेत गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना साद घातली. या संदर्भात मदतीच्या सूचनाही दिल्या.
6/8

दरम्यान, ज्यांचा कॉल आला होता, त्यांनी पुन्हा लोकेशन बदलून सांगितले, आम्ही भंडाऱ्यात असल्याचं ते शिक्षक म्हणाले. तसेच, जखमींना मुंबईला जे जे रुग्णालयात न्यायाचे आहे, आम्ही गाडीही केली आहे. त्यासाठी, पैसे कमी पडत असून मला पैसे पाठवा, अशी मागणी त्यांनी केली.
7/8

रामदास आठवले यांनी देखील आपल्या पीएला फोन करुन पैशांची मदत करण्याच्या सूचना केल्या. मात्र, गुगल पेवर मी पैसे पाठवत नसून मला अकाऊंट नंबर पाठवा असे म्हटले. मात्र, अकाऊंट नंबर देण्यास त्यांनी टाळाटाळ केली.
8/8

ज्यावेळी मदत करण्याची वेळ आली, त्यावेळी हा कॉल बोगस असल्याचं व फसवणूक करणारा असल्याचे लक्षात आला. तसेच, शिर्डीत फोन करुन शाळेच्या सहलीचा चौकशी केली असता हे सगळं बोगस असल्याचं उघड झाल्याचा किस्सा आठवलेंनी सांगितलं
Published at : 15 Feb 2025 04:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
करमणूक
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
