Astro Tips : 'या' 3 लोकांच्या चुकूनही पाया पडू नका, अन्यथा अनर्थ ओढावेल; सनातन हिंदू धर्म काय सांगतो?
Astro Tips : सनातन धर्मानुसार, काही व्यक्तींच्या चुकूनही पाया पडू नये. असं केल्याने आपल्याला पुण्य न मिळता आपण पापाचे भागीदार ठरतो.

Astro Tips : सनातन धर्मानुसार, घराती ज्येष्ठ व्यक्तींच्या तसेच, समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या पाया पडणं म्हणजेच त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. यामुळे व्यक्तीचे संस्कार कळतात. आणि जर कोणी चुकून ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडलं नसेल तर त्या व्यक्तीला संस्कार दिले नाहीत असं सरळ बोललं जातं.
पण, सनातन धर्मानुसार, काही व्यक्तींच्या चुकूनही पाया पडू नये. असं केल्याने आपल्याला पुण्य न मिळता आपण पापाचे भागीदार ठरतो. आपण कोणत्या व्यक्तींच्या पाया पडू नयेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
मंदिरात कोणाच्याही पाया पडू नये
धार्मिक मान्यतेनुसार, जर तुम्ही मंदिरात गेलात तर त्या ठिकाणी कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडू नये. हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण त्या ठिकाणी मंदिर हेच सर्वश्रेष्ठ स्थान आहे. देवापेक्षा कोणताही व्यक्ती छोटा किंवा मोठा नसतो. आणि अशात जर तुम्ही इतरांच्या पाया पडलात तर तो एक प्रकारे देवाचा अपमान करण्यासारखंच आहे.
कुमारिका कन्येपासून कधीही पाया पडून घेऊ नये
धार्मिक मान्यतेनुसार, कुमारिका कन्येला देवीचं रुप मानलं जातं. कन्या घरात जन्माला आली तर ती लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते. तसेच, देवी लक्ष्मी, सरस्वती यांच्या बरोबरीने कन्येला पूजलं जातं. त्यामुळे कधीच कोणत्याही कन्येकडून आपले पाय पडून घेऊ नये. तसेच, पाय धुवून घेऊ नये. असे केल्याने व्यक्तीला पाप लागण्याची शक्यता असते.
जावयाने चुकूनही सासऱ्याच्या पाया पडू नये
शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जावयाने चुकूनही सासऱ्यांच्या पाया पडू नये. माता सतीच्या यज्ञात स्वत:ला जाळून राख झाल्यावर संतापलेल्या भगवान शंकराने आपला सासरा राजा दक्ष याचे शीर कापले तेव्हापासून हा नियम प्रचलित आहे. तेव्हापासून जावयाने सासऱ्याच्या पायाला हात लावणे चुकीचे मानले जाते.
अनेकदा आपल्या हिंदू सनातन धर्मात शास्त्राशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पण, आपण, त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो. त्यामुळे याकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















