एक्स्प्लोर
Mangal Margi 2025 : अवघ्या काही दिवसांत मंगळ ग्रहाचा पॉवरफुल अटॅक; 'या' 3 राशींना सावधानतेचा इशारा, 24 तास राहा सतर्क
Mangal Margi 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाला साहस आणि ऊर्जेचा कारक ग्रह मानला जातो. मंगळ ग्रह 80 दिवसांनंतर मार्गी होणार आहे. याचा शुभ-अशुभ परिणाम सर्व राशींवर होणार आहे.

Mangal Margi 2025
1/7

ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं. मंगळ ग्रहाच्या वक्री होण्याने त्याचा प्रभावकमी होतो. तर, मार्गी म्हणजेच सरळ चालीने मंगळ ग्रहाचा प्रभाव वाढतो.
2/7

मंगळ ग्रहाने 31 जानेवारी 2025 रोजी मिथुन राशीत प्रवेश केला होता. त्यानंतर, येत्या 24 फेब्रुवारी रोजी 7 वाजून 27 मिनिटांनी मंगळ ग्रह मिथुन राशीत मार्गी होणार आहे.
3/7

80 दिवसांनंतर मंगळ ग्रह आपल्या चालीत परिवर्तन करणार आहे. मंगळ ग्रहाच्या या बदलत्या चालीमुळे अनेकांना सावध राहण्याची गरज आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
4/7

मेष राशीच्या लोकांना या काळात सावध राहण्याची गरज आहे. या काळात कोणतेही नवीन काम हाती घेऊ नका. तसेच, तुमच्या वाणीवर लक्ष द्या. तुमच्या बोलण्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या.
5/7

वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाची सरळ चाल फार संकट ओढावू शकते. या काळात तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागेल. तसेच, नवीन नोकरीची संधीही मिळणं कठीण आहे.
6/7

या काळात कर्क राशीच्या लोकांनी फार सतर्क असणं गरजेचं आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर हा काळ तुमच्यासाठी योग्य नाही. विद्यार्थ्यांनी देखील अभ्यासाच्या बाबतीत सतर्क असणं गरजेचं आहे.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 20 Feb 2025 12:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
सोलापूर
आयपीएल
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
