Drishyam 3 : दृश्यम 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार, साऊथ सुपरस्टारची मोठी घोषणा
Drishyam 3 : दृश्यम 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार, साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांची मोठी घोषणा

Drishyam 3 : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल (Mohanlal) यांनी दृश्यम 3 (Drishyam 3) या सिनेमाची घोषणा केली आहे. दृश्यमचे आत्तापर्यंत दोन पार्ट आले आहेत. सिनेमाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिलाय. एवढेच नाही तर दृश्यम 1 आणि दृश्यम 2 या सिनेमांची अनेक भाषांमध्ये रीमेक देखील पाहायला मिळाले आहेत. आत मोहनलाल (Mohanlal) यांनी आज (दि.20) दृश्यम 3 ची घोषणा केलीये. त्यांच्या या सिनेमाचं दिग्दर्शन जीतू जोसेफ करणार आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वरुन मोहनलाल यांनी या सिनेमाची घोषणा केलीये.
The Past Never Stays Silent
— Mohanlal (@Mohanlal) February 20, 2025
Drishyam 3 Confirmed!#Drishyam3 pic.twitter.com/xZ8R7N82un
The Past Never Stays Silent मोहनलाल यांची पोस्ट चर्चेत
मोहनलाल यांनी सोशल मीडियाच्या x प्लॅटफॉर्मवर दृश्यम 3 (Drishyam 3) च्या निर्मात्यांसह एक फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करत त्यांनी दृश्यम 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर केलंय. मोहनलाल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय की," The Past Never Stays Silent.." त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालीये. दाक्षिणात्या सुपरस्टार आणि दिग्दर्शकांचे अनेक चाहते दृश्यम 3 (Drishyam 3) बाबत उत्सुकता असल्याचं बोलत आहेत. दृश्यम हा एक क्राईम थ्रिलर सिनेमा आहे. ज्याने मल्याळम सिनेमाला एका मोठ्या उंचीवर नेले आहे. हा चित्रपट इतका यशस्वी झाला की त्याचा हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, सिंहली आणि अगदी चिनी भाषेतही रिमेक झाला.
The Past Never Stays Silent
— Mohanlal (@Mohanlal) February 20, 2025
Drishyam 3 Confirmed!#Drishyam3 pic.twitter.com/xZ8R7N82un
मल्याळम सिनेसृष्टीत मोठं यश मिळवणारा दृश्यम
दृश्यम (Drishyam) हा सिनेमा 2013 साली प्रथम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमा मल्याळम सिनेमाच्या इतिहास महत्त्वपूर्ण ठरला होता. दृष्यमच्या आठ वर्षांनंतर, दुसरा भाग प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आणि पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला. आता दृश्यमच्या तिसऱ्या पार्टबाबत सर्वांच्या उत्सुकता वाढल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
