Satwiksairaj Rankireddy Father Dies : आज खेलरत्न पुरस्कार मिळणार होता, आजच वडिलांचं निधन, स्टार बॅडमिंटन खेळाडूवर दु:खाचा डोंगर!
सात्विकसाईराज रंकीरेड्डीला आज गुरुवार 20 फेब्रुवारी रोजी खेलरत्न पुरस्कार मिळणार होता.

Satwiksairaj Rankireddy Father Passes Away : सध्या देशातील सर्वोत्तम बॅडमिंटनपटूंपैकी एक मानला जाणारा सात्विकसाईराज रंकीरेड्डीसाठी 20 फेब्रुवारी हा दिवस कोणत्या मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हता. दिल्ली येथे होणाऱ्या 43 व्या पीएसपीबी इंटर युनिट बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणारा सात्विकसाईराज रंकीरेड्डीला आज गुरुवार 20 फेब्रुवारी रोजी खेलरत्न पुरस्कार मिळणार होता.
ज्यासाठी त्यांचे कुटुंबही दिल्लीला जाणार होते, परंतु त्याआधी सात्विकसाईराजचे वडील काशी विश्वनाथम यांचे वयाच्या 65 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सात्विकसाईराजला त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच स्पर्धा अर्ध्यावरच सोडली आणि घरी निघून गेला.
Indian shuttler Satwiksairaj Rankireddy's father R Kasi Viswanatham dies of cardiac arrest on Thursday morning 😢💔
— Khel Now (@KhelNow) February 20, 2025
Om Shanti 🙏🏻 Condolences to Satwik & his Family 🙏🏻#Badminton pic.twitter.com/lzBPfbCHIy
भारतीय बॅडमिंटन स्टार खेळाडू सात्विकसाईराज रंकीरेड्डीचे वडील काशी विश्वनाथम हे निवृत्त शिक्षक होते. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, सात्विकसाईराज रंकीरेड्डीच्या वडिलांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबाच्या जवळच्या माणसानी दिली. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आज सकाळी सात्विक यांच्या वडिलांचे निधन झाले, हे दुःखद आणि दुर्दैवी आहे.
सात्विकसाईराज रंकीरेड्डीचे घर आंध्र प्रदेशातील अमलापुरम येथे आहे. या वर्षी जाहीर झालेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराच्या यादीत सात्विकसाईराजचे नावही होते.
बॅडमिंटनमध्ये सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा डंका!
जर आपण सध्याच्या भारतीय पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडीबद्दल बोलायचे झाले तर, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी अव्वल स्थानावर आहे. या जोडीने 2002 मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, तर त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक जिंकले. सात्विक आणि चिरागची जोडी सध्या बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
